MP Navneet Rana | खासदार नवनीत राणांच्या कृषी महोत्सवावर पोलिसांची कारवाई, परिसरात तणाव

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – युवा स्वाभिमानी पक्षाच्या कृषी महोत्सवामधील आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचे बॅनर पोलिसांनी हटवले आहेत. या महोत्सवामुळे पदवीधर निवडणूक (Graduate Election) आचारसंहितेचा (Code of Conduct) भंग झाल्याचा ठपका ठेवत जिल्हा प्रशासनाने रवी राणा आणि नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचे बॅनर हटवले आहेत. अमरावती पोलिसांनी (Amravati Police) केलेल्या या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

अमरावती येथील सायन्स कोअर मैदानात (Science Core Ground) कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचे बॅनर लावण्यात आले होते. निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचा ठपका ठेवत पोलिसांच्या उपस्थितीत बॅनर हटवण्यात आले. गुरुवार पासून सुरु झालेल्या कृषी महोत्सवाचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी एका संस्थेला कृषी महोत्सव भरवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
यंदाच्या वर्षी मोहोत्सवाची जबाबदारी अमरावती जिल्ह्यातील युवा स्वाभिमान पक्षाने घेतली होती.
या महोत्सवात राज्यभरातील नवतंत्रज्ञान, कृषी पूरक उद्योग, कृषी बचत गट, होम मेड साहित्य अशा विविध वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.

दरम्यान, आज सकाळी कृषी महोत्सवाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले.
याठिकाणी लावण्यात आलेले राजकीय नेत्यांचे बॅनर काढण्यात आले. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

Web Title :-MP Navneet Rana | the Amravati police removed the banners from the agricultural festival of navneet rana party

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rapido Bike Taxi | ‘रॅपिडो’ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, बाईक, टॅक्सीसह सर्व सेवा बंद करण्याचे आदेश; रिक्षाचालकांना मोठा दिलासा

Maharashtra Government | एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! शिंदे-फडणवीस सरकारने घेतला महत्वाचा निर्णय