MP Navneet Rana | ‘ही उद्धवसाहेबांची देण’, न्यायालयातील सुनावणीनंतर नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण प्रकरणावरुन खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणावर मंगळवारी (दि.30) मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) सुनावणी पार पडली. यावेळी नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना न्यायालयासमोर उशिरा हजर राहिल्याने न्यायाधीशांनी त्यांना सुनावलं. न्यायालयातून बाहेर आल्यानंतर नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही सर्व उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) देण असल्याची टीका केली

न्यायालयातील सुनावणी झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना नवनीत राणा (MP Navneet Rana) म्हणाल्या, प्रत्येकवेळी कोर्टात यावं लागतं, हजेरी द्यायला लागते, ऐकावं लागतं. ही उद्धव साहेबांची देण आहे.
हनुमान चालीसा वाचेन म्हटलं होतं तर या सर्व गोष्टी आजही सुरु आहेत. कधी डोंबिवली, बोरिवलीला बोलवतात.
अनेक केसेस सुरु आहेत. तर कधी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात जावं लागतं. एक महिला म्हणून खूप वाईट वाटतंय.
आज रवी राणा यांना बरं नसल्याने मला यावं लागलं. पण मनाला खूप वाईट वाटण्यासारखं आहे.
मात्र, न्यायालयाचे आदेश मान्य करावे लागतात.

हनुमान चालीसा प्रकरणावर राणा दाम्पत्याला अटक (Arrest) करण्यात आली होती.
त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Govt) होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
त्यामुळे राणा दाम्पत्याने ठाकरेंवर निशाणा साधला. दरम्यान, हे प्रकरण मुंबई सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.
सुनावणीच्या वेळी राणा दाम्पत्य गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने त्यांना सुनावलं होतं.
तसेच न्यायाधीश राहुल रोकडे (Justice Rahul Rokde) यांनी कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.
गैरहजेरीमुळे राणांच्या वकिलांना लेखी हमी द्यावी लागली होती. लेखी हमी दिली नसती तर न्यायालयाकडून
वॉरंट बजावण्यात येणार होते. हे वॉरंट टाळण्यासाठी नवनीत राणा मंगळवारी कोर्टात हजर राहिल्या.

Web Title : MP Navneet Rana | this gift of uddhavsaheb navneet ranas reaction after hearing the sessions court said as a woman

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘काँग्रेसला खुश करण्यासाठी उद्धव ठाकरेंची लाचारी!!’, ‘ते’ फोटो ट्विट करत भाजपचा टोला

Pune PMC News | पुणे महानगरपालिका : तुमच्या भागातील नाले सफाईची कामे झाली नसतील तर ‘या’ 2 मोबाईलवर संपर्क साधा, जाणून घ्या नंबर

Adipurush Cinema | आदिपुरूष चित्रपटाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; अवघ्या तासाभरात केला मिलियनस टप्पा पार (VIDEO)