MP New CM Mohan Yadav | मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री, शिवराज सिंह चौहान यांना ‘राजकीय विश्रांती’ दिल्याची चर्चा

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव (MP New CM Mohan Yadav) यांच्या नावाला भाजपा (BJP) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शिवराज सरकारमध्ये मंत्री असलेले मोहन यादव आता मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मनोहर लाल खट्टर, डॉ. के. लक्ष्मण आणि आशा लाक्रा या निरीक्षकांवर मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी सोपवली होती. या निरीक्षकांनी सोमवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन यादव (MP New CM Mohan Yadav) यांचे नाव निश्चित केले.

दरम्यान मोहन यादव यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांना राजकीय विश्रांती दिली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा हे दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. (MP New CM Mohan Yadav)

मोहन यादव यांची ओळख

  • २०१३ मध्ये पहिल्यांदा उज्जैन दक्षिण मतदारसंघातून आमदार
  • २०१८ मध्ये पुन्हा आमदार
  • २०२० मध्ये सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकली
  • २०२० मध्ये शिवराज सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
  • आता मध्ये प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | साहू प्रकरणावरून संजय राऊतांचा भाजपावरही भ्रष्टाचाराचा आरोप, नाव घेतल्याने प्रसाद लाड संतापले

Uddhav Thackeray | दिशा सालियान प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा, ”…अन्यथा तुमच्या कुटुंबीयांची SIT चौकशी लावू”

BJP MLA Prasad Lad | काळापैशाचा आरोप केल्याने भाजपा आमदार प्रसाद लाड संतापले, संजय राऊतांना केली शिवीगाळ, म्हणाले…

CM Eknath Shinde | ”सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय म्हणजे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ”, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे अभिनंदन