MP Rahul Shewale | ‘राहुल शेवाळे एका महिलेला परदेशात घेऊन गेले होते तेव्हा…’ ठाकरे गटाच्या नेत्याकडून मोठा गौप्यस्फोट

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Case) शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत, ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्यांनी राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांच्यावर हल्लाबोल करत जोरदार प्रत्यत्तर दिले आहे. यामध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे (Former MP Chandrakant Khaire) यांनी तर शेवाळे यांच्याबबात काही गौप्यस्फोट केले आहेत.

चंद्रकांत खैरे म्हणाले, राहुल शेवाळे यांची तर अनेक लफडी आहेत. ते एका महिलेला घेऊन परदेशात गेले होते. त्यावेळी त्यांची बायको उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) साहेबांकडे रडत आली होती. मग ती भानगड उद्धव साहेबांनी मिटवली होती, असा गौप्यस्फोट खैरे यांनी केला आहे.

काय म्हणाले राहुल शेवाळे?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी
शिवसेना आमदार (Shivsena MLA) आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूआधी रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) ‘एयू’ नावाने 44 वेळा फोन कॉल आले.
‘एयू’चा अर्थ आदित्य ठाकरे असा होतो, असा आरोप शेवाळे यांनी केला.
लोकसभेत प्रश्न उपस्थित करत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.

Web Title :- MP Rahul Shewale | rahul shewale went abroad with a woman his wife came crying says chandrakant khaire

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Supriya Sule | ‘धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाची भूमिका दुटप्पी, केंद्राने स्पष्ट करावे’ – खा. सुप्रिया सुळे

Ambadas Danve On CM Eknath Shinde | ‘नागपूर भूखंड घोटाळा प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याची एकनाथ शिंदेंना होती कल्पना’ – अंबादास दानवे

Gold Price Today | ऐन लग्नसराईत सोन्याचे दर गगनाला भिडले ! GST सह सोनं प्रतितोळा 57 हजारांच्या घरात, चांदीही 70 हजार पार