MP Sanjay Raut | ‘निकाल आमच्याच बाजूने लागेल असे जे दावा करतायेत त्याचा अर्थ त्यांनी…’, संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात लोकशाही (Democracy of India) आहे की नाही, देशातल्या विधानसभा आणि संसद या संविधानानुसार (Indian Constitution) काम करत आहेत की नाही तसेच न्यायपालिका स्वतंत्र आहे? की कुणाच्या दबावाखाली काम करतेय, याचा उद्या निर्णय होईल, असं विधान खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलं आहे. तसेच निकाल आमच्याच बाजूने लागेल असे जे दावा करत आहेत त्याचा अर्थ त्यांनी गडबड केली आहे, असा आरोप देखील संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) केला आहे.

संजय राऊत (MP Sanjay Raut) पुढे म्हणाले, विधानसभा अध्यक्ष विसरले आहेत की त्यांच्याप्रमाणे जण
असलेली व्यक्ती त्या खुर्चीवर बसलेली होती, त्यांनीही एक निर्णय दिला होता. तरीही सरकार बनले.
मला अजिबात कायद्याचे ज्ञान नाही. पण ते कायदे पंडित आहेत.
हे स्वत:ला कायदे पंडित म्हणत असतील तर मला कायद्याची चिंता वाटते.
आम्ही उद्याच्या निर्णयाची वाट बघत आहोत. आम्हाला खात्री आहे न्याय आम्हालाच मिळेल.

देशाच्या भविष्याचा फैसला उद्या

सत्तासंघर्षाच्या निकालावर राऊत म्हणाले, आमदार अपात्र ठरतील, सरकार येईल, सरकार जाईल, या गोष्टी राजकारणात घडत असतात. पण या देशाच्या भविष्याचा फैसला उद्या होईल. पाकिस्तानात (Pakistan) त्यांचं संविधान जळताना दिसतंय. आपलं दुश्मन राष्ट्र जरी असलं तरी आज तो देश जळतोय, कारण देश संविधानानुसार चालत नाही. कायद्यानुसार आणि संविधानानुसार भारत चालणार की नाही, याचा फैसला उद्या होणार असल्याचे राऊत यांनी म्हटले.

अजित पवारांना टोला

उद्या नीतीश कुमार (Nitish Kumar) मातोश्रीवर येणार आहेत. ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची
भेट घेणार आहेत. त्यानंतर आणखी काही वरिष्ठ नेत्यांना भेटणार आहेत. कुणाला भेटतील ते त्यांचा पक्ष सांगेल.
नाहीतर ते म्हणतील की आमची वकिली करु नका, असं म्हणत संजय राऊतांनी अजित पवारांना (Ajit Pawar) नाव
न घेता टोला लगावला. यापूर्वी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पुढाकार घेतला होता,
आता उद्या नितीश कुमार घेत आहेत. सत्ता परिवर्तन उत्तरेकडील राज्याकडून होते. राष्ट्र म्हणून आम्ही एक आहोत.

Web Title :- MP Sanjay Raut | sanjay raut eaction on maharashtra supreme court on shivsena and shinde mla maharashtra political crisis update

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार, मंत्र्यांवर अपात्रतेची टांगती तलवार, ते 16 आमदार कोण? संपूर्ण यादी

Maharashtra Politics News | ‘मविआचे नेते शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात, हे जबाबदारीने सांगतोय’

Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षावर उद्या निकाल, राज्यात हालचालिंना वेग; दोन्ही गटाचे शिलेदार दिल्लीला रवाना