MP Sanjay Raut | महाराष्ट्रात मुख्यमंत्री नव्हे तर ‘मख्खमंत्री’ बसलाय, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे, नागरिकांमध्येही अस्वस्थता आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा दररोज मुडदा पडत आहे. ब्लॅकमेलिंगचे प्रकरण (Blackmailing Case) थेट गृहमंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे केवळ विरोधकांच्या नावाने खडे फोडत आहेत. ते नाकाने कांदे सोलत आहेत. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात काय झाले होते, याची गुळगुळीत झालेली टेप ते वाजवत असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले.

एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका करताना संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, या राज्यात मुख्यमंत्री नाही तर मख्खमंत्री बसला आहे. राज्याला मुख्यमंत्री असता तर अशी वेळ आली नसती. मुख्यमंत्री केवळ 40 आमदारांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम करत आहेत. कारभाराची सर्व सूत्रे देवेंद्र फडणवीस हलवत आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

आम्ही कुटुंबापर्य़ंत पोहोचत नाही

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना ब्लॅकमेल केल्याच्या प्रकरणावर बोलताना राऊत म्हणाले,
अमृता फडणवीस यांचे ब्लॅकमेलिंग हा तुमचा कौटुंबिक विषय आहे.
आम्हाला भाजपसारखे (BJP) कुटुंबात घुसण्याची सवय नाही.
हे प्रकरण पोलिसांकडे आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. एखाद्या महिलेला अशाप्रकारे ब्लॅकमेल करणे चुकीचे आहे.
अशी घटना घडते याचा अर्थ पोलिसांवर राजकीय दबाव आहे.
देवेंद्र फडणवीस आमच्याकडे बोट करत असताना काही बोटं स्वत:कडे आहेत हे लक्षात ठेवा.
मला तोंड उघडायला लावू नका. हा कुटुंबाचा विषय आहे आणि आम्ही कुटुंबापर्यंत पोहोचत नाही.
माझ्यावर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे संस्कार असून ते मी कायम पाळतो,
असे राऊत यांनी सांगितले.

Web Title :- MP Sanjay Raut | sanjay raut hilarious comment trolls cm eknath shinde being inactive in amruta fadnavis blackmailing case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Paytm News Features | पेटीएम वर ‘हे’ फीचर एक्टिवेट करा आणि मिळावा 100 रुपये कैशबैक

Sanjay Kakade – DHLF Bank Loan | माजी खासदार संजय काकडेंना उच्च न्यायालयाचा दणका, बँकांचं कर्ज थकल्याने संपत्ती जप्त करण्याचे आदेश

Journalist Shashikant Warishe Murder Case | पत्रकार शशिकांत वारिसे यांची जाणीवपूर्वक हत्या, विधानपरिषदेत सरकारची कबुली