MP Sanjay Raut | राहुल गांधी पाठोपाठ संजय राऊतांचीही खासदारकी जाणार?, हक्कभंगाचं प्रकरण राज्यसभेच्या सभापतींकडे वर्ग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी विधिमंडळाचा उल्लेख ‘चोर मंडळ’ असा केला होता. त्यानंतर संजय राऊतांविरुद्ध विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली असून हे प्रकरण राज्यसभेच्या सभापतींकडे (Rajya Sabha Speaker) वर्ग करण्यात आले आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच संजय राऊतांचा (MP Sanjay Raut) खुलासा समाधानकारक नसल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. शुक्रवारी (दि.24) काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केल्यानंतर आता संजय राऊतांचे सदस्यत्व देखील धोक्यात आले आहे.

 

संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यासाठी भाजप आमदार राहुल कुल (BJP MLA Rahul Kul) यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय विधानसभा हक्कभंग समिती (Assembly Disenfranchisement Committee) स्थापन केली होती. राऊत यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्ताव शनिवारी (दि.25) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session) शेवटच्या दिवशी विधानसभेत मांडण्यात आला. संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार असल्यामुळे हक्कभंगाचा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी राज्यसभेच्या अध्यक्षांकडे पाठवण्यात आला आहे.

काय म्हणाले राहुल नार्वेकर?
संजय राऊत यांच्यावरील हक्कभंगासंदर्भात खुलासा देण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती.
याबाबत त्यांनी खुलासा सादर केला आहे. त्यांनी केलेल्या खुलासावर मी विचार केला. पण त्यांचा खुलासा समाधानकारक वाटला नाही. त्यामुळे या प्रकरणात हक्कभंग झाला आहे, या निर्णयपर्यंत मी पोहोचलो आहे, अशी माहिती नार्वेकर यांनी दिली.

 

ते पुढे म्हणाले, राऊतांवरील हक्कभंग प्रकरणासाठी जी समिती गठीत केली होती.
त्या समितीवर राऊतांनी संशय व्यक्त केला. यासंदर्भातील खुलासाही मला समाधानकारक वाटत नाही.
त्यामुळे हे प्रकरण राज्यसभेच्या सभापतींकडे वर्ग करत आहे, असे त्यांनी सांगितले.

 

Web Title :- MP Sanjay Raut | sanjay raut violation of right case infringement proposal send to the rajya sabha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

All India Bank Employees Association (AIBEA) | मोदी सरकार कामगार संघटनांविरोधात – सी. एच. व्यंकटचलम्

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले- ‘एका अहंकारी व्यक्तीमुळे मुंबईचा…’

Majestic Aamdar Niwas | ‘दि मॅजेस्टिक’ आमदार निवास वास्तू नूतनीकरणाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन