MP Sanjay Raut | भाजपा ही भारतीय जुगार पार्टी, अशा लोकांच्या…, संजय राऊत यांचा हल्लाबोल

मुंबई : MP Sanjay Raut | भाजपा (BJP) ही भारतीय जुगार पार्टी (Bhartiya Jugar Party ) आहे. हे वेडे लोक आहेत. अशा लोकांच्या विरोधात आम्ही लढत आहोत म्हणून त्यांना आम्ही विकृत वाटत असू, काही हरकत नाही. आम्ही जर गोष्टी काढायला गेलो तर देश सोडून निघून जातील. भारतीय जुगार पार्टी अर्थात गँबलिंग करणे हेच यांचे ध्येय आहे. नैतिकतेचे धडे दुसऱ्यांना शिकवत असतात. मात्र यांच्यासारखी भ्रष्ट पार्टी दुसरी नाही, असा हल्लाबोल, शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला आहे.

फडणवीसांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जी टीका केली ती योग्यच आहे. मी मनोरुग्ण आहे. कारण महाराष्ट्राच्या हिताचा विचार आम्ही करतो. त्यामुळे आम्ही मनोरुग्ण आहोत. आम्ही मुंबईसह महाराष्ट्र भांडवलदारांच्या घशात घालण्याला विरोध करत आहोत. एका उद्योगपतीला मुंबई विकण्याला विरोध केल्यामुळे आम्ही मनोरुग्ण वाटत असू तर आम्ही आहोत मनोरुग्ण. मनोरुग्ण कोण आहे? ते लवकरच समजेल.

संजय राऊत पुढे म्हणाले, कॅसिनोमध्ये काय कुणी सँडविच खायला जात नाही. मकाऊ, बँकॉक हे काही थंड हवेचे ठिकाण नाही. अशा ठिकाणी जाऊन बसणे हा काही गुन्हा नाही. मी कुठे म्हटले गुन्हा आहे? पण जाऊन तुम्ही खोटे बोलत आहात. मकाऊला मी पण जाऊन आलो आहे. एक गाव कसे उभे राहते आहे ते मी पाहिले आहे. आपण जबाबदार लोक आहोत. इथे येऊन आम्हाला ज्ञान दिले जाते आहे. भाजपाला हे अंगावर ओढून घेण्याची गरज नव्हती.

राऊत यांनी पुढे म्हटले की, प्रत्यक्षदर्शी असे सांगतो की, त्या रात्री फोटोतल्या व्यक्तीने साडेतीन कोटींचे पोकर्स विकत घेतले. पोकर्स ही तिथली करन्सी आहे. त्यांच्यापुढे पोकर्स आहेत. मला ते माहीत नव्हते. माझ्याकडे २७ फोटो आणि व्हिडीओ आहेत. आणखी एक महाशय होते त्यांनीही दोन कोटींचे पोकर्स विकत घेतले आहेत. आता भाजपाच्या लोकांना अच्छे दिन आले असतील.

राऊत यांनी म्हटले, मी काही कुणाला म्हणालो आहे का? जे छायाचित्र समोर आले त्यात त्या महाशयांचे कुटुंब आहे का? दीडदमडीची टोळधाड आमच्यावर का सोडत आहात? इतके तुमचे मन तुम्हाला का खाते आहे? त्यामुळे माझ्यावर, आमच्या सहकाऱ्यांवर टोळधाड का सोडत आहात? लंडनला महाराष्ट्रातल्या आमदारांचे शिष्टमंडळ गेले. तिथे लोकांना वाटले की अशा प्रकारे अभ्यास करावा ते करु शकतात. आमचा आक्षेप असण्याचे कारण नाही.

आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) फोटोवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले,
आदित्य ठाकरेंचा जो फोटो पोस्ट केला आहे त्यात नीट बघा.
तो ग्लास आहे की डाएट कोकचा कॅन आहे? एकदा नीट बघा. मी काल त्यावर उत्तर दिले आहे.
मोदींचे किती फोटो दाखवू? मोदी जे पितात तोच ब्रांड आहे. डाएट कोक आदित्य ठाकरे पित आहेत.
हे दिसत असताना हे लोक इतके घाबरले की त्यांना फोटो पोस्ट करताना भान राहिलेले नाही.
ईडी आणि सीबीआय यांच्या हातात नसतील तर यांच्यासारखे डरपोक लोक नाहीत.
मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, कुणीही तोंडपाटिलकी करु नये. हिंमत असेल तर समोर या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

बावनकुळेंचं नाव मी घेतलंच नव्हतं, भाजपावाले हिट विकेट झाले, संजय राऊतांचा टोला