MP Sanjay Raut | ‘ललित पाटील ड्रग्जप्रकरणात दोन कॅबिनेट मंत्र्यांची नावे, त्यासाठी एसआयटी नेमा’ – संजय राऊतांचे आव्हान

मुंबई : MP Sanjay Raut | दिशा सालियन मृत्यूप्रकरणी (Disha Salian Death Case) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची चौकशी करण्यासाठी महायुती सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. यावर आक्रमक झालेले शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजपावर (BJP) जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Lalit Patil Drug Case) दोन कॅबिनेट मंत्र्यांची नावे आली असून एसआयटी चौकशीच करायची असेल तर त्यांची करा, असे आव्हान राऊत यांनी दिले आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले, सध्या एसआयटींचा पाऊस पडत आहे. आमच्या सरकारच्या काळात ३ गंभीर विषयांवर
आम्ही एसआयटी नेमली होती, ती एसआयटी विद्यमान सरकारने रद्द केली. आयएनएस विक्रांत, नवलानीची एसआयटी
होती ती रद्द केली. हे केवळ राजकारण सुरू आहे.

राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, ललित पाटील ड्रग्जमधील (Drug Mafia Lalit Patil) आरोपी आहे, त्याचे दोन
कॅबिनेट मंत्र्यांशी (Cabinet Ministers) थेट संबंध आहेत. ते प्रकरण दुर्लक्षित करण्यासाठी ही एसआयटी चौकशी होत आहे.
चौकशी करायची असेल तर करा, पण ललित पाटील प्रकरणीही एक चौकशी नेमा.

दरम्यान, दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या एसआयटी समितीमध्ये
अपर पोलीस आयुक्त राजीव जैन (Addl CP Rajeev Jain), उपायुक्त अजय बंसल (DCP Ajay Bansal),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव (Sr PI Chimaji Adhav) यांचा समावेश आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satara Dhom Dava Kalwa | धोम डावा कालवा फुटला, मध्यरात्री ओढ्याला पुर आल्याने ऊसतोड मजुरांचे संसार वाहून गेले
Pune Police MCOCA Action | पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ‘मोक्का’ची ‘सेन्चुरी’ (नॉट आऊट), आतापर्यंत 649 आरोपींवर MCOCA कारवाई

Green Chilli For Health | हिवाळ्यात हिरवी मिरची खाल्याने होतात जबरदस्त फायदे…

Yoga For Weight Loss | वाढते वजन लवकर कमी करण्यासाठी ‘ही’ 5 योगासने आहेत सर्वोत्तम, लवकरच होईल शरीरातील अतिरिक्त चरबी कमी…

Benefits Of Superfood Corn | हिवाळ्यात कॉर्न खाणे का आहे फायदेशीर? जाणून घ्या यामागचे वैज्ञानिक कारण…

गुन्हे शाखेच्या युनिट-3 कडून 2 तडीपार गुन्हेगारांवर कारवाई, सराईत गुन्हेगाराकडून पिस्तुलासह 2 राऊंड जप्त

Lokayukta Bill In Maharashtra | मुख्यमंत्री, मंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत; विधान परिषदेत विधेयक मंजुर, लोकायुक्त निवड समितीही पारदर्शक