MP Shrikant Shinde | ‘वादावर पडदा पडण्याचा प्रश्नच नाही, आम्ही…’, जाहिरात वादावर खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटाकडून (Shinde Group) ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात देऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा दावा करण्यात आला. यानंतर भाजप (BJP)-शिंदे गटाच्या कार्यकर्ते-नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर विरोधकांकडून या जाहिरातीवर (Advertisement) आणि भाजप-शिंदे गटाच्या युतीवर सडकून टीका करण्यात आली. यावर खासदार श्रीकांत शिंदेंनी (MP Shrikant Shinde) प्रत्युत्तर दिले. ते शनिवारी कल्याणमध्ये (MP Shrikant Shinde) माध्यमांशी बोलत होते.

श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) म्हणाले, खालच्या स्तरावर होणाऱ्या गोष्टीमुळे एवढ्या मोठ्या युतीवर परिणाम होत नाही. ही युती वेगळ्या विचाराने झाली आहे. एका विचाराने, एका उद्देशाने तयार झालेल्या युतीत इतक्या किरकोळ कारणाने वितुष्ट येणार नाही. आज या ठिकाणी भाजप- शिवसेनेचे (Shivsena) सर्वच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यावरुन चित्र स्पष्ट आहे.

कार्यकर्त्यांसाठी भावनिक मुद्दा

कार्यकर्ते कायम उत्सूक असतात. ते त्यांच्या स्तरावर काही ना काही करत असतात. तो दोन्हीकडील कार्यकर्त्यांसाठी भावनिक मुद्दा असतो. मात्र, आजच्या उपस्थितीवरुन सर्व चित्र स्पष्ट आहे. वेगळं सांगण्याची गरज नाही. कार्यकर्ते समजदार असतात, असं मत श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलं.

वादावर पडदा पडण्याचा प्रश्नच नाही

श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले, वादावर पडदा पडण्याचा प्रश्नच नाही. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रच काम करत आहोत.
अनेक भूमिपूजनाचे कार्यक्रम झाले. ते सर्व एकत्रच झाले. उगाच वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

विरोधकांना बघवत नाही

विरोधकांच्या टीकेवर ते म्हणाले, विरोधकांना दुसरं काही काम उरलेलं नाही.
भाजप-शिवसेनेत कसं वितुष्ट निर्माण होईल, लावालाव्या कशा करायच्या हे सुरु आहे. विरोधकांना बघवत नाही.
आमच्यात सर्व गोष्टी चांगल्या सुरु आहेत. आम्ही महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं, विकास करण्याच काम करु,
असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Web Title :  MP Shrikant Shinde | shrikant shinde comment on criticism by opposition on advertisement dispute

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raosaheb Danve | रावसाहेब दानवेंचं वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘आम्ही त्यांना पैसे दिले हे…’

Pune Police News | पुणे : बांधकाम ठेकेदारास वेठीस धरणारे 2 पोलिस तडकाफडकी निलंबीत, जाणून घ्या प्रकरण

Devendra Fadnavis | जाहिरातीवरील शरद पवारांच्या खोचक टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘अशा गोष्टींना…’

Pune Crime News | पोलिसाच्या थोबाडीत मारल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी अटकेत; 3 दिवसांची पोलीस कोठडी