MP Supriya Sule | एसटी विलिगीकरणाचा मुद्दा तर NCP च्या जाहीरनाम्यात, मग का पूर्ण नाही?; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MP Supriya Sule | गेल्या काही दिवसांपुर्वी एसटी कामगारांनी संप (ST Workers Strike) पुकारला होता. एसटी महामंडळाचं Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) राज्य सरकारमध्ये विलिगीकरण करण्याची मागणी त्यांनी केली होती (Demand Of MSRTC Merger In Maharashtra State Government). जवळपास सहा महिने संप चालला यामध्ये अनेक एसटी कामगारांनी (MSRTC Workers) आपलं जीवन संपवलं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये (2019 Maharashtra Assembly Election) प्रचारावेळी राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये ( NCP Manifesto) विलीगीकरणाचं आश्वासन दिलं होतं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना (MP Supriya Sule) याबाबत विचारण्यात आलं?, यावर बोलताना सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

 

एसटी विलिगीकरणाचा मुद्दा हा फार गुंतागुंतीचा होता, आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिलेला संदर्भ वेगळा होता. त्यानंतर कोरोनामुळे आर्थिक गणित कोलमडलं त्यामुळे आता ते करणं शक्य झालं नाही. कोरोनामुळे झालेल्या परिणामांमधून बाहेर पडल्यानंतर विलिगीकरणाचा विचार करण्यात येईल, असं सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी म्हटलं आहे. ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या.

एसटी संपावेळी सरकार एसटी कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला. यावर बोलताना, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी अनेक बैठका घेतल्या मात्र एसटीच्या नेतृत्त्वात एकवाक्यता नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी घरावर केलेल्या हल्ल्याला मी हल्ला म्हणणार नाही तर घटना म्हणेल.
तिथं जे लोक आले होते ते आपल्या राज्यातील होते, त्यांच्या मनात कोणी राग भरला असेल,
मात्र त्यांना वाटत होतं की तिथं गेल्यावर प्रश्न सुटेल. राज्यातील सरकारचे आम्ही अविभाज्य घटक आहोत
त्यामुळे त्यांचं ऐकून घेणं आमची जबाबदारी असल्याचं सुळेंनी सांगितलं.

 

Web Title :- MP Supriya Sule | NCP leader and mp supriya sule comment on msrtc merger in maharashtra state government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा