Pune Crime | मेफेड्रोन (MD) बाळगणाऱ्या चौघांना हिंजवडी पोलिसांकडून अटक

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मेफेड्रॉन अंमली Mephedrone Drug (MD) पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी चार जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उमेद मोहजम शेख (Umed Mohajam Shaikh), निहाल रसउल्ला शेख (Nihal Rasulla Sheikh), अब्दुल कादिर सय्यद (Abdul Qadir Sayyed), अमित तलाराम भाटे (Amit Talaram Bhate) यांच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) एन.डी.पी.एस. ॲक्ट (N.D.P.S. Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Pune Crime) केली आहे.

 

याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राजेंद्र सिताराम कुरणे (Police Constable Rajendra Sitaram Kurne) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी उमेद शेख (वय-21 रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), निहाल शेख (वय-21 रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), अब्दुल सय्यद (वय-23 मयुर पम्लोरामा, नेहरुनगर, पिंपरी), अमित भाटे (वय-25 रा. विनोदे वस्ती, हिंजवडी) यांना अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.26) जुना पुणे बेंगलोर महामार्गावरील (Old Pune Bangalore Highway) ताथवडे येथे करण्यात आली. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन मेफेड्रॉन हा अंमल पदार्थ जवळ बाळगला. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी ताथवडे (Tathawade) येथील पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता 1 ग्रॅम 490 मी.ली. मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी एका दुचाकीचसह एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके (PSI Yashwant Salunke) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Hinjewadi police arrested four people carrying mephedrone drug (MD)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा