MP Supriya Sule | पुण्यातील शाळेत मुलाचं लैंगिक शोषण हा गंभीर प्रकार, सखोल चौकशी करा; सुप्रिया सुळेंची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MP Supriya Sule | पुण्यातील एका शाळेत पहिलीमध्ये शिकत असलेल्या 7 -8 मुलांचं लैंगिक शोषण त्याच शाळेत शिकणाऱ्या मुलांनी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्विट करुन याप्रकरणी पोलिसांनी लक्ष देऊन याची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेता समुपदेशनाची देखील आवश्यकता असल्याचे सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी म्हटले आहे.

पुण्यातील एका शाळेत सात ते आठ मुलांचं लैंगिक शोषण त्याच शाळेतील मुलांनी केल्याचा आरोप पालकांनी केला.
मोठ्या इयत्तेत शिकत असलेल्या मुलांकडून खालच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप
पालकांनी केला. यानंतर संतप्त पालक व मनसे कार्यकर्त्यांनी शाळेच्या आवारात आंदोलन करुन काही वेळासाठी
शाळा बंद केली होती. कार्यवाही करुन गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पर्वती पोलिसांनी (Parvati Police Station)
दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आलं. (MP Supriya Sule)

https://x.com/supriya_sule/status/1711615482259009854?s=20

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

पुण्यातील एका शाळेत लहान मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून याप्रकरणी पोलीसांनी लक्ष देऊन याची सखोल चौकशी करावी. या प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेता समुपदेशनाची देखील येथे आवश्यकता आहे. पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्त यांनी याप्रकरणी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी. यासोबतच राज्य शासनाने देखील शालेय मुलांसाठी समुपदेशनाबाबत एक कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. यासाठी या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, तज्ज्ञ व्यक्ती, मानसोपचारतज्ज्ञ आदींची बैठक घेऊन याबाबत सकारात्मक विचार करुन निर्णय घ्यावा, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. (Pune News)

रॅगिंगचा गुन्हा दाखल

पहिलीतील विद्यार्थ्याला त्रास दिल्याप्रकरणी एका स्कूल मधील विद्यार्थ्यांविरुद्ध रॅगिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एका स्कूल मधील वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापिका यांच्यविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाला वरच्या वर्गातील मुलं चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होते. या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर जीवे मारु, अशी धमकी दिली होती. त्यामुळे मुलगा घाबरला होता, असे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स आहे म्हणत पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला 18 लाखांचा गंडा

Pune PMC News | घरातील खराब गाद्या, उश्या, फर्निचर, ई- कचरा टाकायची चिंता सोडा ! महापालिका 14 ऑक्टोबरपासून हा कचरा गोळा करण्यासाठी तुमच्या भागात राबवतेय विशेष मोहीम