MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंने केले TDM चित्रपट पाहण्याचे आवाहन; पुन्हा नव्या जोमाने करणार प्रदर्शित

पोलीसनामा ऑनलाइन – MP Supriya Sule | राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) दिग्दर्शित ‘टीडीएम’ (TDM) चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापूर्वी हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता मराठी चित्रपटांना महाराष्ट्रात स्क्रिन मिळत नसल्याने भाऊराव कऱ्हाडे यांनी चित्रपटगृहातून हा चित्रपट मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. आता मात्र पुन्हा एकदा TDM चित्रपट येत्या 9 जूनला नव्या जोमाने प्रदर्शित (TDM Release Again) केला जाणार आहे. हा चित्रपट सर्व प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन बघण्याचे आवाहन खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केले आहे.
व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा
https://twitter.com/supriya_sule/status/1665751986401345536?s=20
खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून TDM चित्रपटासाठी एक खास पोस्ट केली आहे. यामध्ये एक व्हिडीओ पोस्ट करून TDM मराठी चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. या व्हिडीओमध्ये सुप्रिया सुळे म्हणत आहे की, ‘आज इंदापूरला आल्यावर ऋषी मला भेटले, ऋषीनी टीडीएम नावाच्या सिनेमात काम केलं आहे. दादांनी आणि मी हा चित्रपट पाहिलाय, तुम्ही कधी पाहणार? नक्की चित्रपट पाहा, तुम्हाला नक्की आवडेल.’ असे लिहीले आहे. तसेच TDM मधील काही क्षण या व्हिडीओमध्ये दाखवले आहे.
सुप्रिया सुळे यांनी याच्या कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, ‘आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील
(Baramati Lok Sabha Constituency) इंदापूर तालुक्याचे सुपुत्र आणि विद्या प्रतिष्ठानचे माजी विद्यार्थी ऋषि विलास काळे (Rishi Kale) यांची भेट झाली. ऋषी लवकरच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या टि.डी. एम. या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. भेटीदरम्यान त्याचा कलाक्षेत्रातील प्रवास जाणून घेऊन त्याचे अभिनंदन केले. त्याला 9 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. आपणही सर्वांनी हा चित्रपट नक्की पहा!’
यापूर्वी महाराष्ट्रातच मराठी चित्रपटाला प्राईम टाईमच्या स्क्रिन मिळत नसल्याची खंत दिग्दर्शक भाऊराव कराडे
आणि कलाकारांनी व्यक्त केली होती. यावेळी सर्व कलाकार आणि टीम भावुक झालेली दिसली.
त्यामुळे या सिनेमाचे स्क्रिनिंग थांबवण्यात आले होते. आता पुन्हा एकदा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
स्क्रिन उपलब्ध होत नव्हती त्यावेळी TDM च्या मदतीला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आले होते.
त्यांनी या चित्रपटाबद्दल एक ट्वीट करत लिहिले होते की, ‘राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे
यांच्या टिडीएम या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रीन न मिळणं अत्यंत दुर्दैवी आहे.
संबंधितांनी या चित्रपटाला प्राईम टाईम स्लॉटमध्ये लवकरात लवकर स्क्रिन उपलब्ध करुन द्यावी.’
आता चित्रपट पुन्हा एकदा रिलीज होत असताना चित्रपट पाहण्याचे आवाहन खा. सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केले आहे.
Web Title : MP Supriya Sule | supriya sule shared post on social media for tdm marathi movie
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा