MP Udayanraje Bhosale | छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर?, खासदार उदयनराजे भोसलेंनी मांडली भूमिका

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांनी महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहेत. नुकतेच हिवाळी अधिवेशनात (Winter Session) विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) धर्मवीर (Dharmaveer) नव्हे तर स्वराज्यरक्षक (Swarajrakshak) होते असे विधान केले होते. यावरुन राज्यात वादंग निर्माण झाले होते. त्यांच्या या विधानावर भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) नेत्यांनी निषेध व्यक्त केला होता. याच दरम्यान आता छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanaraje Bhosale) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरही होते, असे उदयनराजे भोसले (MP Udayanaraje Bhosale) यांनी म्हटले आहे.

खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरही होते. शिवाय त्या काळात शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि संभाजी महाराजांनी अनेक मशिदी (Mosque) आणि मंदिरं (Temple) बांधली. साताऱ्यातील शाही मशिदीची देखरेख आमच्या कुटुंबाकडून केली जाते, असंही उदयनराजे भोसले यांनी सांगितले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

महापुरुषांवरील आक्षेपार्ह विधानावरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले,
सर्व धर्म समभाव ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराज यांनी मांडली होती.
त्यांनी कोणत्याही जाती-धर्मातील लोकांसोबत भेदभाव केला नाही. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या सोयीने
बोलत असते. मात्र, शिवाजी महाराज अथवा संभाजी महाराजांनी कधीही कोणत्याही धर्माचा अनादर केला नाही.
त्यांनी त्याकाळी मंदिर, मशिद बांधल्या. आजही साताऱ्यातील शाही मशिदीची देखरेख आमच्या कुटुंबाकडून
केली जाते. त्यामुळे यावरुन कोणताही वाद घालू नये. कारण दोघेही स्वराज्यरक्षक होते,
त्यांनी सर्व धर्मांचा आदर केला म्हणून ते धर्मवीरही होते.

Web Title :- MP Udayanraje Bhosale | udayanraje bhosle reaction on political hassle over shivaji maharaj and sambhaji maharaj satara

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Davos World Economic Forum 2023 | दावोस जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार; एक लाखांहून अधिक रोजगार निर्मिती

Pune District Planning Committee | पुणे जिल्हा नियोजन समितीवर सदस्य नियुक्त; 20 जणांचा समावेश

Sanjay Raut | ‘फडणवीस बदला घेतात की नाही, हे मी सांगू शकत नाही,’ संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सूचक विधान

Nashik Crime | नाशिक पुन्हा हादरलं! जुन्या भांडणातून तरुणाचा निर्घृण खून, 24 तासात दोन घटना