
Sanjay Raut | ‘फडणवीस बदला घेतात की नाही, हे मी सांगू शकत नाही,’ संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सूचक विधान
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – येत्या २३ जानेवारीला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यावेळी त्यांच्या स्मरणार्थ विधिमंडळात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. मात्र, या कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांचा मुलगा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना न दिल्यामुळे एक नवा वाद उपस्थित झाला आहे. यावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर जोरदार निशाना साधला आहे. महाराष्ट्रात सुडाचे राजकारण सुरू असल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यावेळी बोलताना म्हणाले. तसेच यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक सुचक विधान केले आहे. ते आज (दि.१८) माध्यमांशी संवाद साधत होते.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘सरकार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र लावत आहे आणि त्यांचे चिरंजीव जे राज्याचे मुख्यमंत्रीही होते, त्यांना सन्मानाने बोलवत नाही. याचा अर्थ तुमच राजकारण सुरू आहे. उद्धव ठाकरे म्हणातात की, राज्यात बाप पळवणारी टोळी आली आहे, यात तथ्य आहे. आम्ही जेव्हा सावरकरांचे तैलचित्र लावलं होतं, तेव्हा आम्ही त्यांच्या नातेवाईकांना आमंत्रित केलं होतं. ही या राज्याची परंपरा राहिली आहे. मात्र, राज्य सरकारकडून कोणत्याही परंपरा पाळल्या जात नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच तैलचित्रामागे नेमकं काय राजकारण आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही.’ असे संजय राऊत म्हणाले.
तसेच देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना त्यांना विविध कार्यक्रमात महाविकास आघाडीकडून बोलावले
गेले नव्हते त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना याविषयीचे निमंत्रण दिले गेले नाही का? याबद्दल संजय राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘फडणवीस असं काही करतील, असं वाटत नाही. ते बदला घेतात की नाही, हे मी सांगू शकत नाही. मात्र, महाराष्ट्रात बदला आणि सुडाचे राजकारण सुरू आहे.’ अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली.
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर देखील जोरदार टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या संरक्षक भिंती तोडण्यात आल्या असा
आरोप युवासेनेकडून करण्यात आला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की,
पंतप्रधान मोदी यांच्या मागच्या वेळच्या दौऱ्यावेळी देखील अशीच मुंबई विद्यापीठात घाण करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा महत्वाची आहे. पण त्यासाठी चांगली ठिकाणे बिघडवणे, हे चुकीचे आहे.
असा टोला त्यांनी यावेळी बोलताना आयोजकांना लगावला.
तसेच, यावेळी बोलताना त्यांनी दावोस दौऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार टीका केली.
Web Title :- Sanjay Raut | sanjay raut criticized shinde government for not invite uddhav thackray on balasaheb thackeray painting inauguration program
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Fire News | मंगळवार पेठेतील जुन्या बाजारातील दुकानांना आग; आगीत १० दुकाने भस्मसात
Pune District Planning Committee | पुणे जिल्हा नियोजन समितीवर सदस्य नियुक्त; 20 जणांचा समावेश
Shehnaaz Kaur Gill | अभिनेत्री शहनाज गिलच्या विंटर लूकने चाहते थक्क; शेअर केले खास लूकमधील फोटो