MP Udayanraje Bhosale | ‘तटकरे कुठल्या पक्षात आहेत?’ तटकरेंच्या ‘त्या’ प्रश्नावर उदयनराजेंची खोचक प्रतिक्रिया

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – 350 व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त (Raigad Shivrajyabhishek Sohala) किल्ले रायगडावर (Raigad Fort) राज्य सरकारकडून (State Government) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांच्यासह अनेक लोकप्रतिनीधी आणि शिवप्रेमी उपस्थित होते. मात्र, यावेळी सोहळा अर्धवट सोडून खासदार सुनील तटकरे (NCP MP Sunil Tatkare) निघून गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं. याबाबत तटकरे यांनी केलेल्या आरोपांवर उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी प्रत्युत्तर देताना खोचक सवाल केला आहे.

काय म्हणाले सुनील तटकरे?

आज मी एक शिवभक्त नागरिक म्हणून इथे आलो होतो. शिवराज्याभिषेक सोहळा पूर्ण होईपर्यंत मी शिवभक्त मावळा म्हणून उपस्थित होतो. पण नंतरचा कार्यक्रम जरा राजकीय होता. मी या विभागाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतो. एक शिवभक्त म्हणून माझ्या भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) चरणी अर्पण करण्याची राजशिष्टाचारानुसार असणारी माझी संधी का डवलली गेली? मला माहित नाही. त्यामुळे पुढचा कार्यक्रम राजकीय विचारांचा असेल असं समजून मी तिथून निघालो. एक शिवभक्त म्हणून तिथे झालेल्या ऐतिहासिक सोहळ्याला मी उपस्थित होतो, असेही तटकरे म्हणाले.

तटकरे कोणत्या पक्षात आहेत?

सुनील तटकरे यांच्या आरोपांवर खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी खोचक
प्रतिक्रिया दिली आहे. सुनील तटकरे आत्ता कुठल्या पक्षातले आहेत? हा कार्यक्रम शासकीय नसता,
राजकीय असता तर त्यांना कार्यक्रमाला बोलवलं असतं का? असा सवाल उदयनराजेंनी केला.

विरोधकांवर हल्लाबोल

Advt.

कार्यक्रमासंदर्भात टीकात्मक भूमिका घेणाऱ्यांचा उदयनराजेंनी चांगलाच समाचार घेतला.
ते म्हणाले, या लोकांचे कुणी हात पकडले होते का? कुणी थांबवलं होतं का? छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेता,
पण असे कार्यक्रम तुम्ही घेत नाही. तुमचा नकर्तेपणा किंवा आळशीपणा लपवण्यासाठी एखादा मनापासून
असा कार्यक्रम नियोजित करत असेल, तर नाव ठेवण्याचं काय कारण? तुम्ही करा ना? तुम्हाला कुणी थांबवलं होतं का?,
असं उदयनराजे भोसले म्हणाले.

Web Title :  MP Udayanraje Bhosale | udayanraje bhosale slams ncp sunil tatkare on Shivrajyabhishek Sohala 2023 Raigad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mahavitaran News | चाकणमध्ये महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने एमआयडीसीमध्ये (Chakan MIDC) भारनियमनाची शक्यता

Pune Politics News | शिरुरमधून निवडणूक लढवण्यास अनेक इच्छूक, अजित पवार म्हणाले- ‘मग बिघडले कुठे?’

Richest Indian Actress | ‘या’ अभिनेत्री आहेत देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री, कोट्यावधी रूपयांच्या मालकीण