Advt.

MP Vinay Sahsrabuddhe | भाजप खासदाराची मुख्यमंत्र्यांवर टीका; म्हणाले – ‘वडिलांना वचन दिलं म्हणून दुसऱ्याचं मुख्यमंत्रिपद घेतलं’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  MP Vinay Sahsrabuddhe | राज्यात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. नुकतंच आघाडी सरकारला दोन वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकात राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. दरम्यान, भाजपचे राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे (MP Vinay Sahsrabuddhe) यांनी महाविकास आघाडी सरकारवर आज हल्लाबोल केला आहे. त्यावेळी ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

 

त्यावेळी बोलताना विनय सहस्रबुद्धे (MP Vinay Sahsrabuddhe) म्हणाले की, ‘महाविकास आघाडीची 2 वर्षे भ्रष्टाचाराची आहेत.
आपत्ती कोसळावी तसं सरकार जनतेवर कोसळलं आहे. हे सरकार स्थापन व्हावं, ही नागरिकांची इच्छा नव्हती. सरकारला जनादेश नाही.
राजकारणानं विचित्र वळण घेतलं आहे. या सरकारमध्ये धोरण, समन्वय आणि एकमुखी नेतृत्व नाही.
ही महाविकास आघाडी नसून महाविनाश आघाडी आहे,’ अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.

 

पुढे ते म्हणाले, भाजपची साथ सोडून काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत आघाडी करणाऱ्या शिवसेनेवर (Shiv Sena) देखील विनय सहस्रबुद्धे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
‘शिवसेनेनं आरे कॉलनीतील कारशेड प्रमाणे हिंदुत्वाची भूमिका हलवली.
वडिलांना वचन दिलं म्हणून दुसर्‍याचं मुख्यमंत्रिपद घेतलं,’ असा टोला देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लगावला आहे.

दरम्यान, ‘राज्यातील सरकारची जनतेशी बांधिलकी नाही. सत्तेचं व्यसन लागलेलं त्रिकूट एकत्र आलं आहे.
अनुनयवादाची कास धरणारं हे सरकार ‘रझा अकादमी’वर बंदी घालत नाही.
सरकारच्या त्रासातून कधी सुटका होणार हा सामान्यांचा सवाल आहे.
जनता हतबुद्ध आहे. सरकार पडेल ही जनतेची आस आहे,’ तर, ‘दारूचे दर कमी केले जातायत.
पण इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होत नाहीत ही लोकांची पिळवणूक आहे.
सर्व गोष्टींचं खापर केंद्रावर फोडलं जात आहे,’ असंही सहस्रबुद्धे  यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : MP Vinay Sahsrabuddhe | bjp leader and mp vinay sahsrabuddhe attacks cm uddhav thackeray and maha vikas aghadi in pune today marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

IND Vs NZ Test Series | टीम इंडियाला मोठा धक्का ! रोहित-विराटनंतर ‘हा’ दिग्गज टेस्टमधून बाहेर

IND Vs NZ Test Series | कानपूर टेस्ट मॅचपूर्वी चेतेश्वर पुजाराकडून किवींना ‘इशारा’

Pune Crime | पुण्यातील आयबी गेस्ट हाऊसमध्ये धक्कादायक प्रकार ! सुरक्षा रक्षकानं बाथरूममध्ये अंघोळ करणार्‍या 36 वर्षीय महिलेचं केलं व्हिडीओ शुटिंग