म्हणून त्याने दिला व्हॉट्सअ‍ॅपवर तिहेरी तलाक  

भोपाळ (मध्य प्रदेश) : वृत्तसंथा – तिहेरी तलाक वरून देशाचे राजकारण तापलेले असतानाच तिहेरी तलाकचे एक अजब उदाहरण समोर आले आहे. हुंड्यात रिक्षा मिळाली नाही म्हणून व्हॉट्सअ‍ॅपवर तिहेरी तलाक देऊन लहानग्या मुलासह घरातून हाकलून दिल्याची घटना मध्य प्रदेश मध्ये घडली आहे. न्याय मिळवण्यासाठी त्या पीडित २१ वर्षीय महिलेने पोलीसात धाव घेतली आहे.

सिरपूर कांकड भागात राहणाऱ्या आफरिन बी या महिले सोबत तिच्या पतीने हे दुष्कृत्य केले आहे. हुंड्यात रिक्षा नमिळाल्यामुळे माझा पती शाहरूख अन्सारीने व्हॉट्सअ‍ॅपवर ऑडिओ मेसेज पाठवून मला तलाक दिला आहे. त्याच प्रमाणे त्याने दुसरे लग्न करणार असल्याचे देखील म्हणले आहे. माझे आई वडील आमचा संसार चालावा म्हणून दर महिन्याला काही रक्कम मला देतात. म्हणून माझ्या सासरच्या माणसांनी नवऱ्याला रिक्षा घेऊन देण्यासाठी तगादा लावला. माझ्या आई वडिलांनी नवऱ्याला रिक्षा घेऊन दिला नाही म्हणून त्याने मला तलाक दिला आहे असे पीडित आफरिन यांनी म्हणले आहे.

पीडित महिलेचा अन्सारी याच्या सोबत तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्या महिलेला दोन वर्षाचा एक मुलगा आहे. नवऱ्याने व्हॉट्सअ‍ॅपवर तिहेरी तलाक दिल्यानंतर आफरीन या आपल्या आईवडिलांच्या घरी छोट्या मुलासह राहत आहेत. मी नवऱ्याच्या विरोधात कायदेशीर लढाई लढणार आहे असे आफरीन या पीडित महिलेने म्हणले आहे. पोलीस अधीक्षक रुचितवर्धन मिश्रा यांनी या घटनेबद्दल आपले मत पत्रकाराजवळ व्यक्त केले आहे. आम्ही दोन्ही परिवारात बैठक घेऊन हा गंभीर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. प्रश्न असे पोलीस अधीक्षकांनी म्हणले आहे.