MPSC Develops Mobile App | विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी MPSC ने तयार केले मोबाईल ॲप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MPSC Develops Mobile App | विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) विद्यार्थी भिमुख बनवण्यासाठी आयोगाने माहिती तंत्रज्ञानाच्या (Information Technology) आधारे ॲप तयार केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार आहेच शिवाय आयोगाच्या कार्यालयापर्यंत जाण्याचा वेळही वाचणार आहे. यापूर्वी आयोगाने विद्यार्थ्यांसाठी ट्विटर हँडल तयार केले होते. त्यानंतर ॲप लॉन्च केले असून त्याला उपयोजक हे नाव देण्यात (MPSC Develops Mobile App) आले असून ते ॲप गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) उपलब्ध आहे.

 

एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे (Mahesh Bade) म्हणाले की, “आयोगाशी संपर्क साधण्यासाठी संकेतस्थळ, ट्विटर सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहज शक्य झाले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक त्या गोष्टींचा समावेश करून ॲप विकसित केले आहे. दुसऱ्या टप्प्यात त्यामध्ये आणखी काही सुविधांचा समावेश करणे आवश्यक आहे. त्यामुळे हे ॲप विद्यार्थीकेंद्री होईल.”

 

ॲपमध्ये काय?
पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांसाठी या ॲपमध्ये विविध परीक्षांची माहिती आणि जाहिराती तर दिसणारच आहेत.
या शिवाय डॅशबोर्डवर सूचना/परिपत्रके, वेळापत्रके, अभ्यासक्रम, मागील प्रश्नसंच, उत्तरतालिका, निकाल या सगळ्यांचे पर्याय उपलब्ध आहेत.
त्याचबरोबर या ॲपमधूनच थेट आयोगाच्या ट्विटर हँडललाही जाता येणार आहे.

 

Web Title :- MPSC Develops Mobile App | mpsc develops mobile app for students available on the google play store marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UPI Payments Without Internet | विना इंटरनेट सुद्धा करू शकता यूपीआय पेमेंट, जाणून घ्या सोपी पद्धत

 

7th Pay Commission | फिटमेंट फॅक्टरबाबत मोठं अपडेट आलं समोर, सरकारी कर्मचार्‍यांचा वाढणार किमान मूळ पगार

 

PM Suraksha Bima Yojana-PMSBY | PM सुरक्षा विमा योजनेच्या नियमात बदल; प्रीमियम तब्बल इतक्या टक्क्यांनी वाढला, जाणून घ्या

 

Aadhaar Card बाबत आली मोठी माहिती, जर चुकून सुद्धा शेयर केला ‘हा’ नंबर तर खात्यातून गायब होईल बॅलन्स!

 

7th Pay Commission | फिटमेंट फॅक्टरबाबत मोठं अपडेट आलं समोर, सरकारी कर्मचार्‍यांचा वाढणार किमान मूळ पगार