MPSC President – IAS Dr. Dilip Pandharpatte | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – MPSC President Dr Dilip Padharpatte | डॉ. दिलीप ज्ञानेश्वर पांढरपट्टे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. किशोर राजे निंबाळकर यांचा कार्यकाळ१९ सप्टेंबर रोजी संपल्याने त्यांच्या रिक्त जागेवर राज्यपालांनी सोमवारी डॉ. पांढरपट्टे यांची नियुक्ती केली. यापूर्वी डॉ. पांढरपट्टे आयोगाचे सदस्य म्हणून कार्यरत होते. (MPSC President – IAS Dr. Dilip Pandharpatte)

डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या नियुक्तीची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनुसार, आयोगावर पूर्णवेळ अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत डॉ. पांढरपट्टे अतिरिक्त कार्यभार पाहणार आहेत. (MPSC President – IAS Dr. Dilip Pandharpatte)

१९८७ च्या राज्य सेवा तुकडीचे अधिकारी असलेल्या डॉ. पांढरपट्टे यांनी उपजिल्हाधिकारी, उपायुक्त म्हणून कोकण भवनात सेवा केली आहे. २००० मध्ये त्यांना अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती मिळाली. २०१५ मध्ये त्यांची भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्यात आली.

सिंधुदुर्ग, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे व सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.
त्यानंतर ते माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव,
अमरावती विभागाचे आयुक्त होते. मार्च महिन्यांत त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime News | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचा झोन पाचमधील सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा

Vijay Wadettiwar | ‘सत्ता प्राप्तीसाठी खाली केलेले खोके पुन्हा भरण्यासाठी पेपर फुटले’, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर गंभीर आरोप