MPSC Recruitment | भरतीच होत नसल्याने ‘एमपीएससी’ची रिक्त पदे गेली २ लाखांवर, बॅकलॉक भरायचा कसा? आयोग त्रस्त

मुंबई : रिक्त पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरतीच (MPSC Recruitment) होत नसल्याने आता या पदांची संख्या २ लाखांवर गेली आहे. दुसरीकडे मेगाभरती (Mega Recruitment) सरकारने सुरू केली असली तरी भविष्यात हे सर्व कर्मचारी एकाचवेळी निवृत्ती होतील, शिवाय स्पर्धात्मकता आणि पदोन्नतीचे प्रश्न अवघड होऊन बसणार आहेत. ही २ लाख पदे भरायची कशी या महाकाय प्रश्नाने आयोग त्रस्त झाला आहे. (MPSC Recruitment)

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई (Vinod Desai) यांनी ही समस्या मांडली आहे. देसाई यांनी म्हटले आहे की, एमपीएससीच्या २१ हजार पदांची मेगाभरती आठ महिन्यांत पूर्ण होणार असली तरी एकाच वेळेस एवढी पदभरती झाली तर स्पर्धात्मकता व पदोन्नतीचे प्रश्न भविष्यात उभे टाकतील.

विनोद देसाई यांनी म्हटले की, एमपीएससीकडून सुरू असलेली पदभरती आठ महिन्यांत पूर्ण होईल. मात्र, गेल्या तीन वर्षांत निवृत्तीमुळे ६० हजारांच्या आसपास पदे रिक्त झाली आहेत. त्यात आधीपासून रिक्त असलेली पदे धरता हा बॅकलॉग दोन लाखांवर गेला आहे. तो या भरतीने कितपत भरून निघेल? (MPSC Recruitment)

देसाई यांनी म्हटले की, एकाच वेळेस मोठ्या संख्येने पदे भरण्यात आल्याने भविष्यात पदोन्नतीचा प्रश्न उद्भवणार आहे. एकूण पदांपैकी ५० टक्के पदेच पदोन्नतीने भरता येतात. मर्यादित संधीमुळे उमेदवारांची सेवा अडकून पडते. त्यांना एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे अडकून राहावे लागू शकते.

या संदर्भात आयोगाच्या एका सदस्याने प्रतिक्रिया देताना म्हटले की, भरती नाही केली तर प्रशासकीय स्तरावर प्रश्न
उपस्थित होतात आणि भरती प्रमाणापेक्षा जास्त केली तर प्रश्न निर्माण होतात.
या गोंधळात तरुणांचे नोकरीचे वय निघून जात आहे.

राज्याच्या विविध विभागांतील एकूण मंजूर पदे ७.१९ लाख आहेत. तर सध्या कार्यरत असलेल्या ५.१० लाख
कर्मचाऱ्यांच्या वेतनावर सुमारे ३४ हजार कोटी रूपये खर्च होतात. निवृत्तिवेतनावर सुमारे ४१ हजार कोटी रूपये खर्च होतात.

मागील तीन वर्षांत निवृत्त झालेले कर्मचारी
वर्ष अ वर्ग ब वर्ग अराजपत्रित लिपिक एकूण

२०१९-२० ३,९०३ २,१२५ १,२८८ १२,२७७ १९,५९३
२०२०-२१ २,८०१ १,८९० १,३६२ १४,११२ २०,१६५
२०२१-२३ ३,४५९ २,३७९ २,०१० २०,२३७ २८,०८५
एकूण १०,१६३ ६,३९४ ४६६० ४६,६२६ ६७,८४३

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Imbalance Mental Health | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!

Amitabh Bachchan Instagram Post – अमिताभ बच्चनने इंन्टाग्रामवर शेअर केली नातू अगस्त्यसाठी एक खास पोस्ट…

Low Blood Pressure | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!

Ananya Panday Diwali Look | अनन्या पांडेने दिवाळी लूक शेअर करून नेटकऱ्यांच वेधलं लक्ष, व्हायरल फोटो पाहून चाहत्यांची हटेना नजर..

Benefits Of Fruits | ‘या’ 5 फळांचा समावेश करा रोजच्या आहारात, होतील अनेक फायदे…