MS Dhoni | चित्रपटापेक्षा वेगळी व हटके आहे महेंद्र सिंग धोनी व साक्षीची लव स्टोरी

पोलीसनामा ऑनलाइन – भारताचा स्टार क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni) आज वाढदिवस आहे. सर्वाचा लाडका धोनी आज त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करतोय. एम. एस. धोनीचा (MS Dhoni) चाहता वर्ग फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी धोनीची क्रेझ कमी झालेली नाही. त्याच्या जीवनावर आधारित एम.एस.धोनी: अनटोल्ड स्टोरी (M.S. Dhoni: The Untold Story) हा चित्रपट देखील आला. चित्रपटात त्यांची व साक्षीची लव स्टोरी दाखवण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात धोनीची (MS Dhoni) लव स्टोरी वेगळी आहे.

सुप्रसिद्ध क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी व त्याची पत्नी साक्षी धोनी (Mahendra Singh And Sakshi Dhoni) तसेच त्यांची मुलगी जीवा धोनी (Jeeva Dhoni) यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सर्वांना धोनीचे लव मॅरेंज झाले हे माहित आहे. मात्र चित्रपटातील त्यांच्या लव स्टोरी (MS Dhoni Love Story) पेक्षा त्यांची खरी लव स्टोरी वेगळी आहे. महेंद्रसिंग धोनी व साक्षी एकमेंकांना लहानपणापासून ओळखत होते. महेंद्रसिंग धोनी हा आता जरी लग्झरी आयुष्य जगत असला तरी सुरुवातीला अशी परिस्थिती नव्हती. धोनीचे कुटुंब रांची (Ranchi) मध्ये स्थायिक झाले होते. धोनीचे वडिल रांची येथे असलेल्या भारत सरकारच्या स्टील उत्पादन कारखान्यात काम करायचे. या फॅक्टरीत साक्षीचे वडीलही काम करत होते, त्यामुळे दोघेही एकमेकांना ओळखत होते. याशिवाय धोनी आणि साक्षी दोघेही रांचीच्या डीएव्ही श्यामली या एकाच शाळेत शिकले. मात्र, नंतर साक्षीचे कुटुंब डेहराडूनला राहण्यासाठी गेले.

त्यानंतर 2007 साली कोलकत्तामध्ये साक्षी व महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) पुन्हा भेट झाली. त्यावेळी टीम इंडिया (Team India) कोलकात्ता येथील हॉटेल ताज बंगालमध्ये थांबली होती. या हॉटेलमध्ये साक्षी तिची इंटर्नशिप करत होती. मात्र, त्यावेळी दोघांची भेट साक्षीचे मॅनेजर युद्धजित दत्ता यांच्यामुळे झाली. या भेटीनंतर धोनीने युधजीत दत्ताला साक्षीचा नंबर मागितला आणि तिला मेसेजही केला. धोनीचा मेसेज पाहून साक्षी आश्चर्यचकित झाली व मार्च 2008 मध्ये ते रिलेशनशिपमध्ये आले. (MS Dhoni Wedding) 2 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2010 साली त्यांनी लग्नगाठ बांधली.

Web Title :  MS Dhoni | birthday special team india former cricket captain cool mahendra singh dhoni love story with wife sakshi and bollywood connection

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | शरद पवारांच्या वयावरुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र (व्हिडिओ)

Pune: Newly-married girl ends life by jumping into Indrayani river; She was being harassed to get money from her parents’ house

Neelam Gorhe join Shivsena | नीलम गोऱ्हेंचा शिवसेनेत प्रवेश, फडणवीस यांची आश्चर्यकारक उपस्थिती (व्हिडिओ)

Parag Karandikar | अभिमानास्पद ! ‘महाराष्ट्र टाइम्स’चे मुख्य संपादक पराग करंदीकर यांची ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या सदस्यपदी नियुक्ती

Pooja Hegde | अभिनेत्री पुजा हेगडेच्या हॉट फोटोशुटवर नेटकरी फिदा; बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो व्हायरल

Actress Madhoo | ‘रोजा’ सारखा हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री मधूने अचानक का सोडली इंडस्ट्री; सांगितले खरे कारण

Katrina Kaif | कतरिनाचा चाहत्यांसोबत कूल अंदाज; नेटकरी करत आहेत कौतुक