IPL : अटकळांना पूर्णविराम, पुढच्या वर्षीही चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार MS धोनी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अखेर महेंद्रसिंग धोनीने सर्व अटकळांवर पूर्णविराम देत स्पष्ट केले आहे कि, तो पुढच्या वर्षीही आयपीएल खेळणार आहे. रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएल सामन्यात नाणेफेक करताना धोनी म्हणाला की, आयपीएलमधून आपण निवृत्त होणार नाही.

नाणेफेक दरम्यान डेनी मॉरिसनने महेंद्रसिंग धोनीला विचारले की, यलो जर्सीमधील चेन्नई सुपर किंग्जसाठी हा त्यांचा शेवटचा सामना आहे काय? यावर महेंद्रसिंग धोनी म्हणाला की, “निश्चितच नाही आयपीएल 2021 मध्येही तो चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून दिसणार असल्याचे स्पष्ट करून धोनीने सर्व प्रकारच्या अटकळांना पूर्णविराम दिला.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी यावर्षी खूपच खराब होती आणि आयपीएलच्या इतिहासात प्रथमच संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही. तसेच यावर्षी 15 ऑगस्टला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे.