‘त्या’ दोघांच्या मृत्यूला महावितरण कंपनीच जबाबदार

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील खराडी बायपास रोडवर 11 मे रोजी महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट झाला होता. या स्फोटात चहा पिण्यासाठी टपरीवर थांबलेले पंकज कृष्णराव खुणे (वय 26, रा.वर्धा) आणि प्रियंका अनंतराव झगडे (वय 24, सातारा) हे तरुण – तरुणी गंभीर जखमी होऊन त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूला  महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड जबाबदार असून त्यांच्या हलगर्जीपणामुळे दोघांचा मृत्यू झाला असल्याचे तपासात निषप्न झाले असून याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ मे २०१८ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास झेन्सार कंपनीजवळील टेलीफोन केंद्राजवळ फुटपाथवर घडली होती.
[amazon_link asins=’B071X5FS3Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5a204ed3-8100-11e8-8802-b33dec84a5b6′]

या प्रकरणामध्ये चंदननगर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक एस.वाय पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी खराडी कंम्पांऊड लगत असलेल्या ट्रान्सफॉर्मच्या आवारातील एल.टी केबलची देखरेख, देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड चे संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खराडी येथील झेन्सार आयटी पार्कसमोरील फुटपाथजवळ महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरशेजारी स्टॉल आणि चहाच्या टपर्‍या आहेत. त्यामुळे याठिकाणी नागरिकांची वर्दळ असते. घटनेच्या दिवशी  प्रियंका व पंकज हे दोघेही चहा पिण्यासाठी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास टपरीवर आले होते. ते परत जात असताना ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला आणि प्रियंका आणि पंकज यांच्या अंगावर ट्रान्सफॉर्मरमधील गरम ऑईल उडाल्याने दोघेही  गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर नागरिकांनी या दोघांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर एक महिना उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यान पंकज याचा १५ जून तर प्रियंका हिचा १६ जून रोजी मृत्यू झाला.
[amazon_link asins=’B06WWRKRR3′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’63681ace-8100-11e8-9615-2507cf179953′]

या घटनेनंतर महावितरण कंपनीने या घटनेतून अंग काढून घेतले. ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झालाच नसून ट्रान्सफॉर्मर शेजारी असलेल्या सॅन्डविचच्या स्टॉलला आग लागली आणि त्यातून ही दुर्घटना घडल्याचे महावितरणने म्हटले. इतकेच नाही तर या आगीमध्ये महावितरणचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याच्या कारणावरून संबंधीत स्टॉलधारकाविरोधातच चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

महावितरणचा दिलेला अहवाल खोटा असल्याचा आरोप प्रियंका आणि पंकजच्या नातेवाईकांनी केला होता. आपली चूक झाकण्यासाठी महावितरण खोटा अहवाल देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हा ट्रान्सफॉर्मर ज्या ठिकाणी आहे तेथील नागरिकंनी ही स्फोट ट्रान्सफॉर्मरचाच झाला असल्याचे सांगितले होते.

चंदननगर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन महावितरण कंपनीच्या संबंधीत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चंदननगर पोलीस करीत आहेत.