कपिलनंतर छोट्या पडद्यावरील ‘हा’ अभिनेता अडकला लग्नबंधनात 

मुंबई  :वृत्तसंस्था – बॉलिवूडमधील  दीपिका – रणवीर , प्रियांका -निक , श्वेता बसू -प्रसाद, गिन्नी – कपिल  हे कलाकार लग्न बंधनात अडकले असताना आता छोट्या पडद्यावरील  रोडीज फेम रघुरामहा सुद्धा लग्नबंधनात अडकला आहे. त्याने आपली  गर्लफ्रेन्ड नताली डि लुसियो हिच्यासोबत गोव्यात  पारंपरिक पद्धतीने  लग्न केले आहे या लग्नात जवळचे मित्र आणि घरची मंडळी उपस्थित होती.

हे रघुरामचे दुसरे लग्न आहे.याचवर्षी  त्याने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला.  घटस्फोटानंतर काही महिन्यांतच रघुरामने त्याचे व नतालीचे नाते जगजाहिर केले. यानंतर नतालीसोबत साखरपुडा केला.काही दिवसापूर्वी आपण  नतालीया सोबत लग्न करणार असल्याची बातमी सोशल मीडियावर रघुरामने शेअर केली होती.  रघुराम आणि  नताली डि लुसियो हे दोघे २०१६ मध्ये  ‘आंखो ही आंखो में’या गाण्यात एकत्र आले होते.

काही वर्षाआधी तू माझ्या आयुष्यात आली आणि माझा मी मला परत मिळालो. तुझ्यासोबत मी प्रेम अनुभवले, आनंद अनुभवला. तू माझ्या आयुष्यात आशा बनून आलीस. आय लव्ह यू…,  अशी एक  भावूक पोस्ट रघुने लिहिली होती.  नतालीयाने  इंग्लिश विंग्लिश, चेन्नई एक्सप्रेस, लेडीज वर्सेस रिकी बहल अशा अनेक चित्रपटांत गाणी गायली आहेत.