खुशखबर ! घरबसल्या सिनेमा पाहण्यासह ‘JIO FIBER’ देणार ‘या’ 6 महत्वांच्या सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीच्या 42व्या वार्षिक जनरल मीटिंगमध्ये अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की जिओचे ३४ कोटींपेक्षा जास्त ग्राहक झालेत. सब्सक्राइबर, नफा आणि रिव्हेन्यूच्या आधारावर जिओ जगातली सर्वात मोठी टेलिकाॅम कंपनी झाली आहे. याचबरोबर त्यांनी कंपनीच्या अनेक नवीन सेवांची घोषणा केली असून यामध्ये त्यांनी जिओच्या सेट टॉप बॉक्सची देखील घोषणा केली. Jio Fiber या इंटरनेट ब्रॉडबँड सेवेची देखील घोषणा केली असून पुढील महिन्यात म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी या सेवेची सुरुवात करण्यात येणार आहे.

या सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे जिओचे प्रीमियम ग्राहक हि सेवा रिलीज झाल्याच्या दिवसापासूनच सिनेमा बघू शकतात. यासाठी ७०० रुपयांपासून ते १० हजाररुपयांपर्यंत मासिक खर्च येणार आहे. Jio Fiber या सेवेसाठी आतापर्यंत दीड कोटी नागरिकांनी रजिस्ट्रेशन केले असून यासाठी कंपनी जवळपास साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. यावेळी बोलताना अंबानी म्हणाले कि, १ वर्षात संपूर्ण देशात हे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

या आहेत खास सुविधा
१) जिओ प्रीमियमचे ग्राहक रिलीज झाल्यानंतर लगेलच सिनेमा पाहू शकतात.
२) याशिवाय कंपनी जिओ पोस्ट पेज प्लस सेवा देखील लॉन्च केली आहे.
३) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड १४ टेक्नॉलॉजी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करत आहेत.
४) जिओ फायबरचे वार्षित पॅक घेतल्यास HD TV ची सेवा मिळेल.
५) जिओ फायबर सेवा ५ सप्टेंबरपासून सुरु होईल.
६) जिओ फायबरच्या प्लॅनमध्ये १०० Mbps ने सुरु होईल.

दरम्यान, ५ संप्टेंबरपासून या सेवेचे सर्व प्लॅन जिओ ऐप आणि जिओच्या वेबसाइटवर उपलब्ध होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. ‘जिओ फायबर वेलकम’ असे या सुविधेचे नाव असून यासोबत एक सेट टॉप बॉक्स देखील मोफत मिळणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like