‘शशी थरुर हे लव्ह गुरु आहेत, त्यामुळे ते विरोधकांवर चिडणारच’

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा होत आहे. परंतु व्हॅलेंटाईन डेला अनेकदा ही आपली संस्कृती नाही असे सांगत अनेकांकडून विरोध केला जातो. याच मुद्द्यावरून अशा विरोध करणाऱ्या लोकांना काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर यांनी एक ट्विट करत टोला लगावला होता. व्हॅलेंटाइन डेला जर संघ परिवाराने तुम्हाला ट्रोल केले किंवा मित्र- मैत्रिणीसोबत बाहेर फिरु नका अशी धमकी दिल्यास त्यांना सांगा तुम्ही भारताचा पारंपारिक कामदेव दिवस साजरा करत आहात असे ट्विट शशी थरूर यांनी केले होते. शशी थरूर यांच्या या ट्विटला केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी उत्‍तर दिले आहे. ‘‘शशी थरुर हे लव्ह गुरु आहेत, त्यामुळे ते विरोधकांवर चिडणारच’’ असे नक्वी यांनी म्हटले आहे.

शशी थरूर यांच्या ट्विटला उत्तर देताना नक्वी म्हणाले की, ‘‘शशी शरुर यांनी केलेली टीका आम्ही समजू शकतो कारण ते स्वतः लव्ह गुरु आहेत. त्यामुळेच कोणी व्हॅलेंटाईन डे ला विरोध केला तर लव्ह गुरु त्याचा विरोध करणार.’’

दरम्यान शशी थरूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘‘व्हॅलेंटाइन डे निमित्त शुभेच्छा देताना संघ परिवाराने तुम्हाला ट्रोल केले किंवा तुम्‍ही मित्र- मैत्रिणींसोबत फिरु नका अशी धमकी दिली तर त्यांना सांगा की, तुम्ही भारताचा पारंपारिक कामदेव दिवस साजरा करीत आहात.” शशी थरूर यांच्या याच ट्विटला नक्वी यांनी उत्तर दिले आहे. शशी थरूर यांना नक्वी यांनी लव्ह गुरु म्हटले आहे.