Multibagger Penny Stock | 1 रुपयापेक्षा सुद्धा कमी होता भाव, वर्षभरात ‘या’ स्टॉकने गुंतवणुकदारांना बनवले करोडपती; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Penny Stock | कधीकधी किरकोळ किमतीचे पेनी स्टॉक्स रिटर्न देण्याच्या बाबतीत ब्रॉडर मार्केट आणि मोठ्या कंपन्यांच्या अनेक मैल पुढे जातात. असाच एक स्टॉक म्हणजे Equipp Social Impact Technologies, ज्याने गेल्या 1 वर्षात बंपर रिटर्न दिला आहे. हा रिटर्न इतका मोठा आहे की ज्यांनी वर्षापूर्वी फक्त लाख रुपये गुंतवले होते ते आता करोडपती झाले असतील. (Multibagger Penny Stock )

 

एक वर्षापूर्वी, या पेनी स्टॉकची किंमत रु.1 पेक्षा कमी होती. गेल्या वर्षी 19 फेब्रुवारी रोजी हा स्टॉक BSE वर फक्त 0.40 रुपये होता, जो आता 77 रुपयांवर गेला आहे. हा 1 वर्षातील 19,275 टक्के इतका मोठा रिटर्न आहे. अशाप्रकारे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याच्या पोर्टफोलिओचे मूल्य 1.93 कोटी रुपये झाले असते.

 

दुसरीकडे, जर आपण ब्रॉडर मार्केट (Broader Market) पाहिले तर, या 1 वर्षात सेन्सेक्स केवळ 13.39 टक्के वाढला आहे. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीपासून बाजारात झालेल्या घसरणीने या बंपर रिटर्नच्या (Bumper Returns) पेनी स्टॉकवरही परिणाम केला आहे. बाजारातील सततच्या घसरणीमुळे या स्टॉकची वाढही सध्या थांबली आहे. (Multibagger Penny Stock)

या वर्षी आतापर्यंत या शेअरच्या किमती 27.18 टक्के आणि या महिन्यात 10.64 टक्क्यांनी घसरली आहे. मात्र, तरी ती 200 – दिवसांच्या सरासरीपेक्षा जास्त आहे.

 

मंगळवारी BSE वर या कंपनीच्या 5,700 शेयरची खरेदी – विक्री झाली. अशा प्रकारे 4.29 लाख रुपयांची उलाढाल झाली.
कंपनीचे एमकॅप सध्या सुमारे 800 कोटी रुपये आहे.
मात्र, कंपनीची आर्थिक कामगिरी शेअर बाजारातील तेजीच्या तुलनेत सापेक्ष नाही.

 

कंपनी सतत तोट्यात ऑपरेट करत आहे. मागील 12 तिमाहीपासून या कंपनीची विक्री शून्य आहे.
डिसेंबर 2018 च्या तिमाहीत कंपनीने शेवटची 0.54 कोटी रुपयांची विक्री नोंदवली होती.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Penny Stock | best multibagger penny stock list bumper return better than broader market

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा