Supriya Sule On Modi Government | ‘…तर मला विजय चौकात फाशी द्या’; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – Supriya Sule On Modi Government | राज्यात चालू असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडीवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत भाजपवर टीका केली. ईडी (ED), आयकर विभाग (IT) आणि सीबीआय (CBI) या स्वतंत्र यंत्रणा आहेत. मात्र या यंत्रणा कोणावर धाड मारणार हे 4 ते 5 दिवस अगोदर ट्विटरवर कसं समजतं?, याबाबत आम्ही पुरावे सादर करू, असं म्हणत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोदी सरकारवर टीका केली. (Supriya Sule On Modi Government)

 

ट्विटरवर सर्व माहिती येते, मी याबाबत पुरावे देऊ शकते. त्यामुळे याचे दोन अर्थ निघू शकतात. केंद्रीय यंत्रणा या सत्तेत असलेल्या लोकांकडून चालवल्या जातात. दुसरी गोष्ट म्हणजे माहिती लिक होत आहे का?, एखादा पेपर लिक झाला तर त्या अधिकाऱ्याची चौकशी करून त्याला तुरूंगात टाकलं जातं. इकडे तुमचे दोन कार्यकर्ते छापे कधी मारणार?, तुरूंगात कधी टाकणार?, याची माहिती देतात आणि मी हे सिद्ध करू शकते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

आमच्याकडून चूक झाली तर फाशी द्या, इथं नाही मला विजय चौकात (Vijay Chowk) जाऊन फाशी द्या. आमची चूक झाली तर आमच्यावर खटलाही चालवा. ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत आहे. आम्ही देखील सत्ताधारी बाकांवर बसलो आहोत. कदाचित आमच्याकडून पीएमएलची चूक झालीही असेल, पण म्हणून आम्हाला फाशी देणार का?,असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) खरं बोलतात. मला वाटतं मी फक्त त्यांनाच याबाबत विचारायला हवं.
सरकारमध्ये इतर कोण खरं बोलतं याबाबत माहिती नाही, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी भाजपला (BJP) टोला लगावला.

 

 

Web Title :- Supriya Sule On Modi Government | NCP MP supriya sule ask modi government to hang her until death in loksabha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya | ‘राष्ट्रवादी-शिवसेना माझा घातपात करणार असल्याचं एसपीच बोलले’; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

 

Pune Crime | पुणे-मुंबई महामार्गावर अवैध मळी टँकरवर कारवाई, 23 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त

 

Modi Government | गरीबांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता 30 सप्टेंबरपर्यंत घेवू शकतात ‘या’ योजनेचा लाभ