Pune Crime | भारती विद्यापीठ पोलिसांकडून सराईत चोरट्याला अटक, 9 गंभीर गुन्ह्याची उकल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील एका फ्लॅटमध्ये चोरी करुन सुमारे 35 हजारांचा माल लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Pune Crime ) आहेत. अमर वैजनाथ संमुखराव (Amar Vaijnath Sammukhrao) (वय, 21 रा. आरवी तानाजीनगर ता. भोर जि. पुणे) याच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल करुन त्याला अटक (Arrested) करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत फिर्याद अक्षय रघुनाथ धनवडे (Akshay Raghunath Dhanwade) (वय,23 रा. सिंहगड कँम्पस आंबेगाव, पुणे) याने दिली. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) केली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, आंबेगाव येथील सिंहगड कँम्पस परिसरातील एका फ्लॅटमध्ये अज्ञाताने प्रवेश करुन तेथील एक बँग, लॅपटाॅप, 3 मोबाईल आणि रोख रक्कम 1300 रुपये लंपास केले. ही घटना 21 मार्च रोजी घडली. दरम्यान चोरी झाल्याची तक्रार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) देण्यात आली होती. या तक्रारीवरुन तपास पथकाने याप्रकरणी तपास सुरु केला असता सदरची चोरी संशयित अमर संमुखराव यांनी केली असल्याची माहिती मिळाली. ही माहिती पोलीस अमंलदार हर्षल शिंदे (Hershal Shinde) आणि धनाजी धोत्रे (Dhanaji Dhotre) यांना मिळाली. यानंतर सापळा रचला. (Pune Crime)

 

22 मार्च रोजी स्वामी नारायण मंदिर परिसरात अमर दुचाकीवर निदर्शनास आला. त्याची विचारपूस केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांंनी खाक्या दाखवताच त्याच्याकडे चोरी गेलेला मोबाईल आढळला. दरम्यान त्याच्याकडे असणारी दुचाकीही चोरीची असल्याचे पोलिस तपासात निष्पण्ण झाले. त्यानंतर अमर याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. अमरने पुर्वी अनेक चोरी केल्याचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

दरम्यान, चोरी गेलेले 3 मोबाईल, लॅपटाॅप जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर आणखी चोरलेले 6 मोबाईल जप्त केले आहेत. 26 मार्चपर्यंत न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी (Police cell) सुनावली असून याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड (API Vaibhav Gaikwad) करत आहेत.

 

सदरची कारवाई परिमंडळ दोनचे पोलिस उप आयुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil),
सहाय्यक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan),
वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior PI Jagannath Kalaskar),
पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगिता यादव (Police Inspector Sangita Yadav),
पोलीस निरीक्षक विजय पुराणिक (Police Inspector Vijay Puranik)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड (API Vaibhav Gaikwad),
पीएसआय नितिन शिंदे (PSI Nitin Shinde) आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Bharti Vidyapeeth police arrest thief, solve 9 serious crimes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule On Modi Government | ‘…तर मला विजय चौकात फाशी द्या’; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

 

MPSC Exam 2022 | एमपीएससीच्या ‘गट क’ वर्गातील पूर्वपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

 

Pune Youth NCP | कोथरूड मधील वाहतुक कोंडी विरोधात युवक राष्ट्रवादीचे पोलिसांकडे निवेदन