Multibagger Penny Stock | 35 पैशांच्या ‘या’ शेअरनं केली गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई, लाखाचे झाले 10 कोटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Multibagger Penny Stock | शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक (Investment) करणं हा जुगार (Gambling) असल्याचा गैरसमज असल्यानं आपल्या देशात फार कमी जण यामध्ये गुंतवणूक करतात. शेअर बाजारात (Share Market Marathi News) अगदी कमी कालावधीत प्रचंड परतावा मिळू शकतो. सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि. (Sel Manufacturing Company Ltd) च्या शेअर्सनी कमाल केली आहे. या शेअरने गेल्या सहा महिन्यात तब्बल एक लाख टक्क्यांहून अधिक परतावा (Return) देऊन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. गेल्या काही सत्रांपासून कंपनीचे शेअर्स सातत्याने अपर सर्किटवर (Upper Circuit) दिसत आहेत. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये सात पट वाढ झाली आहे. 8 मार्च रोजी कंपनीचे शेअर NSE वर 4.99 टक्क्यांनी वाढून 376.45 रुपयांवर पोहोचले. (Multibagger Penny Stock)

 

6 महिन्यात 35 पैशांचा शेअर्स 376.45 रुपयांवर पोहोचला

हा मल्टीबॉगर स्टॉक (Multibogger Stock) 27 ऑक्टोबर 2021 रोजी NSE वर 35 पैशांच्या पातळीवर बंद झाला.
सहा महिन्यानंतर आता या शेअरची किंमत 376.45 रुपयांवर पोहोचली आहे.
या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 107,457.14 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
यावर्षी 2022 मध्ये हा शेअर 44.40 रुपयांनी (3 जानेवारी 2022) वाढून 376.45 रुपयांवर पोहोचला आहे.
या दरम्यान या शेअरने 747.86 टक्क्यांचा परतावा दिला. फक्त एका महिन्यात या शेअरने 1252.14 टक्क्यांचा परतावा दिला आहे. (Multibagger Penny Stock)

 

गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 35 पैसे प्रति शेअर, या हिशेबाने 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याची ही रक्कम आज 10 कोटींहून अधिक झाली असती.
तसेच या वर्षी एखाद्या गुंतवणूकदाराने 44.40 रुपये प्रति शेअर दराने एक लाख रुपये लावले असते.
तर आज हीच रक्कम 8.45 लाख रुपये इतकी झाली असती.

 

Web Title :- Multibagger Penny Stock | share market these multibagger penny stock delivered 1 lakh percent return investors get 10 crore rupees

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा