Multibagger Penny Stocks 2022 | यंदाच्या वर्षी ‘हे’ 3 स्टाॅक ठरु शकतात ‘मल्टीबॅगर’; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Multibagger Penny Stocks 2022 | नव्या वर्षात म्हणजेच 2022 मध्ये पेनी स्टॉक मल्टीबॅगर (Multibagger Penny Stocks 2022) ठरले आहे. स्टॉकमध्ये कमी लिक्विडिटीमुळे अस्थिरता निर्माण होते, यामुळे पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक (Investment) करणे धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान जर एखाद्या छोट्या कंपनीचे फंडा मेंटल (Fundamental) मजबूत असतील, तर पेनी स्टॉकमध्ये (Penny Stock) गुंतवणूक केल्यास अधिक रिटर्न मिळणार आहे. दरम्यान, चॉईस ब्रोकिंगच्या सुमीत बगाडिया (Sumeet Bagadia) यांनी तीन पेनी स्टॉक सांगितले आहेत. त्यापैकी मल्टी बॅगर हे रिटर्न देऊ शकणार आहे.

सुझलॉन एनर्जी (Suzlon Energy) –

मंथली चार्टवर, सुझलॉन एनर्जी स्टॉकने 5 महिन्यांचा सुटका दिली आहे आणि जुलै 2021 रोजी तयार केलेल्या 9.45 रुपयांच्या पूर्वीच्या उच्चांकाच्यावर राहिला आहे. सुझलॉन एनर्जीमध्ये 10 रुपये अथवा 8 रुपयांवर गुंतवणूक करत 15 आणि 20 रुपयांसाठी टारगेट ठेवण्याचा सल्ला बगाडियांनी दिला आहे. दरम्यान, त्याची सपोर्ट पातळी 6 रुपयांवर आहे, ज्यात स्टॉप लॉस ठेवता येईल असं त्यांनी सांगितलं आहे. (Multibagger Penny Stocks 2022)

आयएफसीआय (IFCI) –

मंथली चार्टवर, आयएफसीआय (IFCI) स्टॉकने ६ महिन्यांचे कंसोलिडेशन सुटका दिली आहे. तर 16 रुपये 40 पैशांच्या आधीच्या उच्च स्तरावर गेला आहे. IFCI शेअर्समध्ये आता 25 ते 30 रुपयांचे टारगेट दिसते, म्हणून16 अथवा 14 रुपयांवर हे शेअर्स खरेदी करण्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच, 11 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवा, असंही त्यांनी सांगितलं.

व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) –

मंथली चार्टवर व्होडाफोन आणि आयडियाच्या (Vodafone Idea) शेअर्सने 13.50 रुपयांचा प्रतिकार पातळीची सुटका केली आहे. डेली चार्टवर, सिमिट्रिकल ट्रायांगल लाइन फॉर्मेशनवर ब्रेकआउट दिलेय, जो येत्या काळात तेजीचा संकेत देतो आहे. दरम्यान, हे शेअर्स 14 अथवा 13 रुपयांवर खरेदी करा असं देखील सांगण्यात आलंय.
तसेच आगामी काळात यामध्ये 20 ते 25 रुपयांचे टारगेट दिसत असल्याचे ते म्हणाले. 10 रुपयांवर स्टॉप लॉस लावणे.
आणि 5G रोलआउट नंतर त्यात 28 ते 30 रुपयांची पातळी दिसून येऊ शकते.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की,
मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

Web Title : Multibagger Penny Stocks 2022 | three stocks suzlon energy ifci and vodafone idea could become multibagger penny stocks in 2022 know in details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,

केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी;
जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत;
जाणून घ्या कमतरतेची लक्षणे