Multibagger Stock | 10 पैशांच्या जबरदस्त स्टॉकने गुंतवणुकदारांच्या 1 लाखाचे केले 57 कोटी रुपये, दिला 5 लाख टक्के भरभरून रिटर्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | तुम्हाला शेअर बाजारातून (Stock Market) करोडपती व्हायचे असेल तर तुमच्यात संयम असायला हवा. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी, ’खरेदी करा, होल्ड करा आणि विसरा’ या धोरणाचा अवलंब करण्याशिवाय श्रीमंत होण्यासाठी दुसरा कोणताही शॉर्ट कट नाही. (Multibagger Stock)

 

प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे (Warren buffett) एकदा म्हणाले होते की जर एखादा गुंतवणूकदार 10 वर्षे स्टॉक ठेवू शकत नसेल तर त्याने 10 मिनिटे स्टॉक ठेवण्याचा विचारही करू नये. जीआरएम ओव्हरसीज शेअर्स (G R M Overseas Ltd) याचे जिवंत उदाहरण आहे. या शेअरने आपल्या शेअरधारकांना जास्तीत जास्त 571,850 टक्के स्टॉक रिटर्न (Stock Return) दिला आहे.

 

10 पैशांवरून 571.95 रुपयांवर पोहोचला शेअर
G R M Overseas कंपनीचे शेअर्स 1 ऑक्टोबर 2004 रोजी 10 पैशांवरून (1 ऑक्टोबर 2004 ची बीएसईवर बंद किंमत) 571.95 रुपये प्रति शेअर पर्यंत वाढले. 18 वर्षात कंपनीच्या शेअरने सुमारे 5 लाख 71,850 टक्के रिटर्न दिला आहे. (Multibagger Stock)

23 मार्च 2012 रोजी जीआरएम ओव्हरसीजचा शेअर्स 1.85 रुपये प्रति शेअर होता, जो आता 571.95 रुपयांवर पोहोचला आहे.
या शेअरने दहा वर्षांत सुमारे 30816.22% रिटर्न दिला आहे.
या शेअरने पाच वर्षांत 9,545.03 टक्के रिटर्न दिला आहे. पाच वर्षांपूर्वी 29 मार्च 2017 रोजी शेअरची किंमत 5.93 रुपये होती. (Share Market Marathi News)

बीएसईवर या शेअरची किंमत (G R M Overseas Ltd share price) 7 मार्च 2020 रोजी 7.93 रुपयांवरून वाढून 571.95 रुपये झाली.
तीन वर्षांत सुमारे 7112.48 टक्के इतका मजबूत रिटर्न दिला आहे.
एका वर्षात, स्टॉक रु. 85.52 (बीएसईवर 19 मार्च, 2021) वरून 571.95 वर पोहोचला.

6 महिन्यांत हा स्टॉक 211.63 रुपयांवरून 571.95 रुपयांपर्यंत वाढला आहे.
मात्र, या वर्षी 2022 मध्ये, स्टॉक आतापर्यंत 12.74 टक्क्यांनी तोट्यात आहे. गेल्या पाच सत्रांमध्ये स्टॉक 4.49% घसरला आहे.

गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा फायदा
GRM Overseas Ltd च्या शेअर प्राईस हिस्ट्रीनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 18 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 10 पैसे दराने 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आजपर्यंत ही गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आज ही रक्कम 57.19 कोटी रुपये झाली असती.
त्याच वेळी, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1.85 रुपये दराने 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 3 कोटी रुपये झाली असती.

पाच वर्षांत 1 लाख रुपयांची गुंतवणूक 96.45 लाख रुपये झाली असती.
तीन वर्षांत 1 लाख रुपयांची गुंतवणूक 68.57 लाख रुपये झाली असती.
त्याच वेळी, 1 लाख रुपयांची गुंतवणूक एका वर्षात 6.68 लाख रुपये झाली असती. 1 लाख रुपयांची गुंतवणूक सहा महिन्यांत 2.70 रुपये झाली.

 

काय आहे कंपनीचा व्यवसाय ?
GRM Overseas ही तांदूळ निर्मिती आणि व्यापारात गुंतलेली एक भारतीय कंपनी आहे.
कंपनी जगभरातील ग्राहकांसाठी तांदळाच्या विविध जातींचे उत्पादन करते.
पारंपारिक बासमती राईस, सुपर बासमती तांदूळ, भारतीय 1121 सुपर राईस, भारतीय लांब राईस, शरबती राईस आणि सुगंधा राईस यांचा समावेश आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | grm overseas ltd share given 5 lakh percent return in 18 years 1 lakh turn to 57 crore rupees

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा