
Multibagger Stock | 1 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ स्टॉकने बदलले गुंतवणुकदारांचे नशीब, 1 लाख झाले रू. 65.06 लाख, तुमच्याकडे आहेत का?
नवी दिल्ली : Multibagger Stock | सिम्प्लेक्स पेपर्सच्या स्टॉकने (Simplex Papers stock) मागील एक वर्षात आपल्या शेयरधारकांना 6,406% रिटर्न दिला आहे. हा पेनी स्टॉक (Penny stock) 3 डिसेंबर 2020 ला 0.80 रुपये होता, शुक्रवारी तो बीएसईवर 52 आठवड्यांचा उच्च स्तर 52.05 रुपयांवर पोहचला. एक वर्षापूर्वी सिम्प्लेक्स पेपर्सच्या स्टॉकमध्ये गुंतवलेली एक लाख रुपयांची रक्कम आज आज 65.06 लाख रुपये झाली असती. (Multibagger Stock)
याच्या तुलनेत या दरम्यान सेन्सेक्स 29.82 टक्के वाढला आहे. मागील 21 सेशनमध्ये मायक्रोकॅप स्टॉक 169.69% वाढला आहे. शेयर 4.94% च्या वाढीसह 52.05 रुपयांवर खुला झाला आणि बहुतांश सत्रासाठी 5% च्या वर सर्किटमध्ये अडकून राहिला.
फर्मचे मार्केट कॅप वाढून 15.62 कोटी रु. झाले
सिम्प्लेक्स पेपर्सचा स्टॉक 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. फर्मचे मार्केट कॅप वाढून 15.62 कोटी रुपये झाले. फर्मच्या एकुण 18,000 शेयर्सने आज बीएसईवर 9.30 लाख रुपयांचा व्यवहार केला.
सप्टेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीसाठी, 13 प्रमोटरकडे 72.05% भागीदारी किंवा 21.62 लाख शेयर आणि सर्वाजनिक शेयरधारकांकडे कंपनीची 5,174 27.95% भागीदारी किंवा 8.38 लाख शेयर होते. (Multibagger Stock )
या वर्षाच्या सुरुवातीपासून 5,814% पर्यंत उसळला हा शेयर
सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस 5,047 सार्वजनिक शेयरधारकांकडे 2 लाख रुपयांपर्यंतचे व्यक्तीगत शेयर भांडवल होते आणि त्यांच्याकडे 3.76 लाख शेयर किंवा 12.54% भागीदारी होती.
मागील तिमाहीत कोणत्याही शेयरधारकाकडे 2 लाख रुपयांपेक्षा जास्तीचे व्यक्तिगत शेयर भांडवल नव्हते. एका म्युच्युअल फंडकडे फर्ममध्ये 102 शेयर होते. सप्टेंबर तिमाहीच्या अखेर आयुर्विमा महामंडळाकडे (LIC) फर्मची 12.91% भागीदारी किंवा 3.87 लाख शेयर होते.
21 डिसेंबर 2020 ला शेयर 52-आठवड्याचा खालचा स्तर 0.84 रुपयांवर पोहचला.
स्टॉक एक महिन्यात 157.04% वाढला आहे आणि यावर्षीच्या सुरूवातीपासून 5,814% पर्यंत उसळला आहे.
जाणून घ्या इतर माहिती
ओरिएंटल इन्श्युरन्स कंपनीकडे फर्मची 1.70% भागीदारी किंवा 50,940 शेयर होते.
सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस 9 आर्थिक संस्थांकडे फर्ममध्ये 4,942 शेयर किंवा 0.16% भागीदारी होती
मात्र, आर्थिक कामगिरी फर्मच्या स्टॉकमधील शानदार वाढीच्या अनुरूप नाही.
मार्च 2017 ला संपलेल्या तिमाहीनंतर फर्मने शून्य विक्री नोंदवली आहे.
मागील वेळी डिसेंबर 2016 ला समाप्त तिमाहीत याची व्रिकी 0.08 कोटी रुपये होती.
एका वर्षात आंध्र पेपरच्य शेयरमध्ये 11.93% ची वाढ झाली आहे,
तर ओरिएंट पेपरच्या भागीदारीत 61% टक्के वाढ झाली आहे.
या कालावधी दरम्यान पेपर मिल्सच्या शेयरमध्ये 42.64% घसरण आली आहे.
Agio पेपर लिमिटेडच्या स्टॉकने मागील एक वर्षात 345.65% ची रॅली पाहिली आहे.
Web Title :- Multibagger Stock | multibagger stock simplex papers 85 paisa to 52 rupees 1 lakh become rs 65 lakh check details
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Beed Crime News | पत्नीचं शेजार्याशी ‘झेंगाट’ असल्याचं पतीला समजलं, बायकोच्या अनैतिक संबंधास कंटाळून 37 वर्षीय नवर्यानं केलं ‘हे’ कृत्य
- PIB Fact Check | मतदान केले नाही तर बँक अकाऊंटमधून कट होतील 350 रुपये? जाणून घ्या वायरल मेसेजचे पूर्ण ‘सत्य’
- Devendra Fadnavis | पुणे मनपावर भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा फडकणारच – देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ)