Devendra Fadnavis | पुणे मनपावर भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा फडकणारच – देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | नव्या कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी लोकांची गर्दी पाहून महानगरपालिकेवर (Pune Corporation) भाजपचा भगवा आणि RPI चा निळा फडकवल्याशिवाय राहणार नाही. आमचा भगवा म्हणणारे आजकाल भगव्याशी प्रतारणा करत त्यामुळे भाजपचा भगवा असे सांगावे लागत असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.

 

पुणे महानगरपालिकेजवळ भाजपच्या नव्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol), भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक (bjp city president jagdish mulik), पुणे मनपातील सभागृह नेते गणेश बिडकर (pmc leader of house ganesh bidkar), पुणे मनपाचे स्थायीचे सदस्य हेमंत रासने (pmc standing committee chairman hemant rasne) यांच्यासह आदी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

फडणवीस म्हणाले, कार्यकर्ते स्वतःहून कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले आहेत. आम्हाला जर शक्ती प्रदर्शन करायचे झाले तर पुण्यातील एकही मैदान पुरणार नाही. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, सावरकरवादी आहोत, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार चालतो असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. महानगरपालिका वर्षानुवर्षे राष्ट्रवादीच्या (NCP) ताब्यात होती. पण पुणेकरांच्या हिताची कामे झाली नाहीत. त्यानंतर भाजपने केलेली कामे पुणेकरांनी पाहिली असून त्यांच्या मनामध्ये भाजप आहे. कोरोनाकाळत महापालिकेने मोठे कार्य केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आवाहनानंतर भाजपचे कार्यकर्ते लोकांची सेवा करत होते असेही फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | municipal elections bjp and rpi will be win pune municipal corporation elections 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sourav Ganguly | सौरव गांगुलींच्या टीमवर सचिव जय शहांची बॉलिंग पडली भारी, फक्त एका रनाने पराभव

Crime News | धक्कादायक ! Facebook वर मैत्री झाली अन् गुंगीचं औषध पाजून केला बलात्कार, अत्याचाराचा व्हिडीओ पाठवून मागितले 10 लाख

Omicron Covid Variant | ‘ओमायक्रॉन सर्वांना मारुन टाकेल, आता मृतदेह नाही मोजायचे’ ! मेडिकलच्या प्राध्यापकाने केली पत्नी, दोन मुलाची हत्या; ‘नोट’ लिहून झाला फरार

Pune Railway Station | पुणे स्टेशनचा भार होणार हलका ! ‘मरे’ वाढवणार हडपसर टर्मिनलमधून सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची संख्या