Multibagger Stock | एक लाख गुंतवून कमावले 64 लाख, तुम्ही सुद्धा घरबसल्या करू शकता असे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | गेल्या काही काळापासून शेअर बाजार जबरदस्त रिटर्न देत आहे. काही शेअर्सने लोकांना रातोरात करोडपती बनवले आहे. असा कोणता स्टॉक आहे, ज्याने गुंतवणूकदारांना इतक्या वेगाने परतावा दिला असेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु, असे बरेच स्टॉक आहेत, फक्त ते वेळेवर ओळखणे आवश्यक आहे. आज अशाच मल्टीबॅगर स्टॉक्सबद्दल (Multibagger Stock) जाणून घेवूयात ज्याने एका वर्षात 1 लाख रुपयांची गुंतवणूक 64 लाखांच्या पातळीवर नेली आहे.

 

1 लाखाचे कसे झाले 64 लाख
2021 मध्ये एक नाही तर अनेक मल्टीबॅगर स्टॉक्सनी गुंतवणूकदारांची पोती भरली आहेत. 2022 मध्येही अनेक समभागांची कामगिरी कायम आहे. असाचा एक स्टॉक ज्याचे नाव Simplex Papers Ltd आहे.

 

या कंपनीच्या शेअरने गेल्या वर्षभरात 10 हजार टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे. मात्र, गेल्या काही सत्रांपासून त्यात घट होत आहे. तरीही, तो याक्षणी 6400 टक्क्यांहून जास्त रिटर्नच्या स्तरावर आहे.

 

कधी आली विक्रमी तेजी?
गेल्या 52 आठवड्यातील सिम्प्लेक्स पेपरच्या स्टॉकचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर डिसेंबर 2021 मध्ये तो 122.70 च्या उच्च पातळीवर होता. त्या वेळी ज्यांनी त्यातून पैसे काढले असते, त्यांना मोठा फायदा झाला असता. (Multibagger Stock)

 

मात्र, तेव्हापासून हा शेअर लाल चिन्हावर बंद होत आहे. जर तुम्ही वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज ते 64 लाखांपेक्षा जास्त झाले असते.

जेव्हा हा शेअर 1 रुपये होता
एक वर्षापूर्वी म्हणजे जानेवारी 2021 मध्ये या पेनी स्टॉकची किंमत 1 रुपया होती. त्यानंतर, ऑक्टोबरपर्यंत त्यात लक्षणीय वाढ झाली नाही, परंतु त्यानंतर चार महिन्यांतच विक्रमी उच्चांकासह 122 रुपयांची पातळी गाठली. म्हणजेच गेल्या सहा महिन्यांतील सिम्प्लेक्सचा रिटर्न उत्कृष्ट आहे, असे म्हणता येईल.

 

सहा महिन्यांत 1500 टक्के रिटर्न
सिम्प्लेक्स पेपरच्या शेअर्सने सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना 1500 टक्के परतावा दिला आहे.
सहा महिन्यांपूर्वी 13 जुलै 2021 रोजी तो 4.63 रुपयांच्या पातळीवर होता.
त्याच वेळी, 13 जानेवारी रोजी बंद झालेल्या सत्रात शेअरची किंमत 64.40 वर पोहोचली आहे.

 

या समभागातून मिळणार्‍या रिटर्नचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

 

सिम्प्लेक्स पेपर्सचा व्यवसाय
भारतातील सिम्प्लेक्स पेपर्स लिमिटेड कागदाच्या घाऊक व्यवसायात गुंतलेली कंपनी आहे.
कंपनी पेपर उत्पादन देखील करते. कंपनीच्या विविध प्रकारच्या कागदांमध्ये रायटिंग पेपर, बाँड पेपर, कॉपियर पेपर,
लेझर पेपर, न्यूज प्रिंट पेपर आणि प्रिंटिंग पेपर यांचा समावेश आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

 

Web Title :- Multibagger Stock | multibagger stock simplex papers ltd has made 1 lac to 64 lac in one year

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Jalgaon Crime | जळगावमध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशीच अत्यंत दुर्देवी घटना ! पतंगांनी घेतला 2 लेकरांचा जीव

 

Mahabaleshwar Temperature | पहिल्यांदाच महाबळेश्वरमध्ये पारा ‘शून्य’ अंशावर, जाणून घ्या राज्यातील परिस्थिती

 

TCS Share Price | टीसीएसच्या शेयरमधून तुम्ही करू शकता 30% कमाई, निकालानंतर काय म्हणत आहेत एक्सपर्ट