Multibagger Stock | TATA Group च्या 3 रुपयांच्या शेअरचा जबरदस्त रिटर्न, एक लाखाचे केले 169 कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | तुमची जर कोणत्याही स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्याची योजना असेल किंवा तुम्ही येत्या काही दिवसांत शेअर बाजारात (multibagger stocks for 2022) गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशा शेअरबद्दल सांगणार आहोत ज्याने खूप लोकप्रियता मिळवली आहे. गुंतवणूकदारांच्या लाखो रुपयांचे रूपांतर कोट्यावधीत नाही तर अब्जावधीत केले आहे. शेअर बाजारातील पेनी स्टॉक्सशिवाय (multibagger penny stocks) लार्ज कॅप शेअरनेही बंपर रिटर्न दिला आहे. (Multibagger Stock)

 

2,611 रुपयांवर पोहोचला टायटन शेअर
हा स्टॉक राकेश झुनझुनवाला यांचा आवडता टायटन स्टॉक आहे. या शेअरची किंमत 3 रुपयांवरून 2,611 रुपये झाली आहे. गेल्या 20 वर्षात या शेअरने 16900 पट बंपर रिटर्न दिला आहे. हा शेअर टाटा ग्रुपचा आहे. टायटनने गुंतवणूकदारांना अल्प आणि दीर्घ मुदतीत चांगला रिटर्न दिला आहे. प्रीमियम गुंतवणूकदारांची पसंत टायटन शेअर आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिला आहे. (Multibagger Stock)

 

शेअरधारकांना दिले बोनस शेअर्स
कंपनीने शेअरधारकांना बोनस शेअर्सही दिले आहेत. मंगळवारच्या व्यवहाराच्या सत्रात हा शेअर 2600 रुपयांच्या वर व्यवहार करत आहे. मागील एका वर्षाबद्दल बोलायचे तर, शेअरने सुमारे 39% चांगला रिटर्न दिला आहे. एक वर्षापूर्वी 30 ऑगस्ट 2021 रोजी या शेअरची किंमत 1878.45 रुपये होती. आता ती वाढत आहे आणि 2600 च्या पुढे व्यवहार होत आहे.

 

पाच वर्षांत 325 टक्के ग्रोथ
1 सप्टेंबर 2017 रोजी शेअरची किंमत 613 रुपये होती. जी 30 ऑगस्ट 2022 रोजी वाढून 2611 रुपये झाली आहे. गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना 325 टक्के रिटर्न दिला आहे. गेल्या पाच वर्षांत हा शेअर सुमारे 2000 रुपयांनी वाढला आहे.

20 वर्षांपूर्वी शेअरची किंमत
20 वर्षांपूर्वी 13 सप्टेंबर 2001 रोजी टायटनच्या शेअरचा दर 3 रुपये होता. आता हा शेअर 2600 रुपयांच्या वर आहे. या काळात शेअरधारकांनी केवळ 3 रुपये ते 2600 रुपये स्तरापर्यंत कमाई केली. या कालावधीत स्टॉक 850 पेक्षा जास्त वेळा वाढला आहे. इतक्या प्रदीर्घ कालावधीत गुंतवणूकदारांनी शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीतून कमाई केलीच, शिवाय कंपनीने या कालावधीत 10 :1 स्टॉक स्प्लिट आणि 1:1 बोनस शेअर देखील घोषणा केली आहे.

 

एक लाखाचे झाले 169 कोटी
कोणत्याही गुंतवणूकदाराला स्टॉक स्प्लिटमधून कमाई होत नाही. परंतु स्टॉक स्प्लिटमुळे, स्टॉकचे युनिट्स वाढतात आणि गुंतवणूकदाराची इनपुट कॉस्ट कमी होते.
टाटा ग्रुपने जून 2011 मध्ये 10:1 स्टॉक स्प्लिटची घोषणा केली,
ज्यांनी ऑगस्ट 2002 किंवा त्यापूर्वी टायटनचे शेअर्स खरेदी केले होते त्यांना याचा फायदा झाला.
20 वर्षांपूर्वी जर कोणी हा शेअर 3 रुपयांच्या पातळीवर विकत घेतला
असता तर त्याचे 1 लाख रुपये आज 169 कोटी झाले असते.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | multibagger stock tata group titan company stock turns rs 1 lakh to rs 169 crore

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार; लग्नाविषयी विचारल्यावर व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

 

Pune Rain | पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात गणरायाच्या स्वागताला पावसाची हजेरी, हवामान खात्याचा इशारा

 

Mohit Kamboj | भाजप नेत्यांबद्दल केलेलं वक्तव्य भोवलं, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल