Pune Rain | पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात गणरायाच्या स्वागताला पावसाची हजेरी, हवामान खात्याचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गणपती बाप्पाच्या आगमनाला (Ganeshotsav 2022) अवघे काही तास शिल्लक राहिले असून बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वच जण सज्ज झाले आहेत. अशातच पुण्यासह राज्यात गणपती बाप्पाच्या स्वागताला पाऊस (Pune Rain) देखील हजेरी लावणार आहे. पुणे शहर (Pune Rain) आणि परिसरात हलक्या (Light) ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची (Moderate Rain) शक्यता आहे. याशिवाय कोकणासह (Konkan) कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara) जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता असल्याची माहित भारतीय हवामान खात्याने (IMD) दिली आहे.

 

दरम्यान पुणे जिल्ह्यात पावसासह (Pune Rain) उन्हाच्या ही झळा बसण्याची शक्यता आहे. पुढच्या काही दिवसांत 30 डिग्रीच्या पुढे तापमान (Temperature) राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने (Meteorology Department) दिली आहे. 2 सप्टेंबरपर्यंत पुणे शहरातील दिवसाच्या सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा अंदाज वर्तवला आहे. सर्वोच्च तापमान 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

 

 

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर आणि परिसरात विशेषत: दुपारी किंवा संध्याकाळी उच्च तापमानामुळे वादळी वारे, विजांचा कडकडाटासह (Thunderbolt) जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच पुढच्या 48 तासांत तापमानात वाढ होऊन पावसाची शक्यता आहे.
तापमानात वाढ झाल्याने 30 आणि 31 ऑगस्ट रोजी जोरदार वारे आणि विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
यामुळे प्रवाशांनी हवामान अंदाज घेऊन बाहेर पडणे योग्य ठरणार आहे.

 

पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी (Anupam Kashyapi) यांनी सांगितले
की, पुण्यात पुढच्या दोन दिवसांत साधारणपणे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
तर सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढेल.

 

Web Title :- Pune Rain | rain attends arrival of ganesh in maharashtra along with pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | ‘लिव्ह-इन’मध्ये राहताना महिलेच्या 13 वर्षाच्या मुलीवर केला अत्याचार; नारायण पेठेतील सूर्यसेन पवारविरूध्द गुन्हा

 

Jalgaon Crime | शर्यतीने घेतला चिमुकल्याचा बळी, कारच्या धडकेत जळगावमध्ये 11 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

 

Mohit Kamboj | भाजप नेत्यांबद्दल केलेलं वक्तव्य भोवलं, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल