Mohit Kamboj | भाजप नेत्यांबद्दल केलेलं वक्तव्य भोवलं, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप (BJP) नेत्यांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष (Nationalist Women State President) विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांच्या विरोधात संताक्रूज पोलीस ठाण्यात (Santacruz Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या तक्रारीवरुन विद्या चव्हाण यांच्यावर आयपीसी 500, 505 (2), 37 (1), 135 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. विद्या चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित शहा (Amit Shah) यांच्या जन्मस्थान आणि भाषेवरुन टीका केली होती.

 

विद्या चव्हण यांनी मोहित कंबोज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्या नंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ट्विट सोबत एफआयआरही शेअर केला आहे. तसेच बजरंग बली की जय, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना विद्या चव्हाण यांनी मोहित कंबोज हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. तो आता आमच्या विरोधात आरोप करणार का ? मोहित कंबोज याला कोणी अधिकार दिले ? कोण आहे तो ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते.

 

मोहित कंबोज असतील किंवा तो किरीट सोमय्या त्यांना गुजरातमध्ये पाठवून द्या ना, त्यांना महाराष्ट्रात आता काही काम नाही.
त्यांनी गुजरातमध्ये जावे, इथे चौकशी करु नये, गुजरातमध्ये अनेक मोठमोठ्या डायमंडचा व्यापार (Diamond Trade) आहे, लोकांचे धंदे आहेत, उद्योग आहेत.
त्यांची चौकशी करावी. महाराष्ट्रात आम्ही लोक आहोत, आम्ही चौकशी करु, आमचं काय करायचे ते करु.
गृहमंत्री प्रामाणिक लोकांच्या चौकश्या लावतो, आणि गुन्हेगार लोकांना मंत्रीपदं देतो,
असे विधान विद्या चव्हाण यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते.
त्याविरुद्ध कंबोज यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रांतिक आणि भाषिक वाद निर्माण केल्याची ही फिर्याद आहे.

 

Web Title : –  Mohit Kamboj | A case has been registered against NCPs womens state president Vidya Chavan over her remarks about BJP leaders

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा