Multibagger Stock | ‘या’ कंपनीने 10 वर्षात 1 लाखाचे केले 86 लाख, तुम्ही गुंतवणूक केली आहे का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | सेन्सेक्स 60 हजार अंकावर गेला आहे. सेन्सेक्सला 50,000 ते 60,000 अंकाच्या स्तरावर पोहचण्यास 8 महिन्यांचा वेळ लागला. या 8 महिन्यात शेयर बाजारात एकुण 42 स्टॉकने मल्टीबॅगर रिटर्न दिला. या दरम्यान काही स्टॉक असेही होते, ज्यांनी 100 टक्केपेक्षा कमी रिटर्न दिला आणि ते मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) च्या यादीत आले नाहीत, परंतु मोठ्या कालावधीत त्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना अनेक पट रिटर्न देऊन मालामाल केले आहे. असाच एक शेयर अ‍ॅस्ट्रल (Astral) चा आहे.

Astral च्या शेयरचा इतिहास
मागील 10 वर्षात अ‍ॅस्ट्रलच्या शेयरचा भाव 23.82 रुपयांवरून वाढून 2063 रुपयांवर (सोमवारच्या व्यवहाराच्या दरम्यान) आला आहे. या दरम्यान या शेयरने सुमारे 8,560 टक्केचा रिटर्न दिला आहे. केवळ मागील एक महिन्यात अ‍ॅस्ट्रलच्या शेयरने 4 टक्केचा रिटर्न दिला आहे आणि या दरम्यान हा शेयर 1982.05 रुपयांच्या भावावरून वाढून 2063 रुपयांवर आला.

या मल्टीबॅगर स्टॉकच्या शेयर (Multibagger Stock) प्राईस हिस्ट्रीनुसार, मागील 6 महिन्यात अ‍ॅस्ट्रलच्या शेयरमध्ये 30 टक्केची तेजी आली आहे. आणि हा शेयर 1591.65 रुपयांच्या भावावरून वाढून 2085.30 रुपयावर आला. तर मागील एक वर्षात अ‍ॅस्ट्रलचा शेयर 850.95 च्या भावावरून 140 टक्के वाढून 2063 रुपयांच्या भावावर आला आहे.

5 वर्षापूर्वी अ‍ॅस्ट्रलच्या शेयरचा भाव 263.73 रुपये होता आणि तेव्हापासून त्याने 680 टक्केचा रिटर्न दिला आहे. अशाप्रकारे मागील 10 वर्षात हा शेयर 23.82 रुपयांच्या भावावरून 86.4 पट वाढून 2063 रुपयाच्या भावावर आला आहे.

 

गुंतवणुकीवर परिणाम

अ‍ॅस्ट्रलच्या शेयरच्या किमती पाहता, जर एखाद्या गुंतवणुकदाराने 10 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये या शेयरमध्ये लावले असते,
तर त्याचे 1 लाख वाढून आज 86.04 लाख रुपये झाले असते.
अशाप्रकारे जर एखाद्या गुंतवणुकदाराने 5 वर्षापूर्वी अ‍ॅस्ट्रलच्या शेयरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणुक केली असती,
तर त्याचे 1 लाख रुपये वाढून 7.80 लाख रुपये झाले असते.

जर एखाद्या गुंतवणुकदाराने 1 वर्षापूर्वी यामध्ये एक लाखाची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 1 लाख वाढून 2.40 लाख रुपये झाले असते.
तर 6 महिन्यांपूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने यामध्ये एक लाख रुपये लावले असते तर त्याचे 1 लाख वाढून 1.30 लाख रुपये झाले असते.
तर या शेयरमध्ये 1 महिन्यापूर्वी लावलेले 1 लाख रुपये आज 1.04 लाख रुपये झाले असते.

या मल्टीबॅगर स्टॉकच्या आउटलुकवर शेयर बाजारच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,
अ‍ॅस्ट्रलचा शेयर चार्ट सकारात्मक दिसत आहे आणि हा कमी वेळात 2250 रुपयांवरून 2300 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
हा स्टॉक 1950 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदी करता येऊ शकतो.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
www.policenama.com
कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

Web Title :- Multibagger Stock | multibagger stocks astral share rs 23 82 to 2063 how rs 1 lakh would have fared

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | शरद पवारांनी घेतली ‘सारथी’ची बैठक ! वडेट्टीवारांकडे असणारी जबाबदारी आता अजित पवारांकडे

Multibagger Stock | ‘या’ कंपनीच्या शेयरने 10 वर्षात दिला तब्बल 8000 टक्के रिटर्न; 10 हजार रुपये झाले 8 लाख

Multibagger Stock | केवळ 12 रुपयाचा शेयर आता 945 वर पोहचला, 1 लाखाचे झाले 80 लाख रुपये