Multibagger Stock | केवळ तीन दिवसात गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा देणारे ‘हे’ आहेत 3 शेयर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) ने शेअर लिस्टिंगच्या दिवशी जरी आपल्या गुंतवणूकदारांना दुखावले असले, तरी डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून कंपनी पॉलिसी बाजार या कंपनीच्या शेअरने मागील तीन सत्रात गुंतवणुकदारांना जबरदस्त रिटर्न दिला आहे. फक्त 3 सत्रांमध्ये चांगला रिटर्न देणारी मिड कॅप आणि लार्ज कॅप स्टॉकमध्ये पॉलिसी बाजार दुसर्‍या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर RattanIndia Infra नाव आहे. (Multibagger Stock)

 

एनएसईवर RattanIndia Infra ने गेल्या 3 सत्रांमध्ये 39.52 टक्क्यांनी वाढ केली आहे. मंगळवारी हा शेअर 43.60 रुपयांच्या वाढीसह बंद झाला. गेल्या एका वर्षात स्टॉकमध्ये 193 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 71 रुपये आणि नीचांकी 14.15 रुपये आहे. त्याच वेळी, RattanIndia Infra च्या शेअरने गेल्या 3 वर्षांत 2026.83 टक्के रिटर्न दिला आहे. (Multibagger Stock)

 

Policy Bazaar या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना केवळ 3 दिवसांत 27.09 टक्के रिटर्न दिला आहे. पॉलिसी बाजारचा शेअर मंगळवारी 4.17 टक्क्यांच्या उसळीसह 698.50 रुपयांवर बंद झाला. मात्र, हा शेअर गेल्या 3 महिन्यांत 8.50 टक्के आणि एका महिन्यात 9.98 टक्क्यांनी घसरला आहे. जर आपण एका आठवड्याबद्दल बोललो तर तो 22.92 टक्क्यांवर गेला आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1470 रुपये आहे आणि कमी 540.10 रुपये आहे.

 

नफा कमावणार्‍या शेअरच्या यादीत एल्गी इक्विपमेंट्स हे तिसरे नाव आहे, ज्याने 3 सत्रांमध्ये 24.56 टक्के रिटर्न दिला आहे. मंगळवारी एनएसईवर शेअर 8.13 टक्क्यांनी वाढून 323.30 रुपयांवर बंद झाला.

Elgi Equipments ला गेल्या तीन महिन्यांत 13.86 टक्के तोटा झाला आहे. मात्र, वर्षभरापूर्वी ज्यांनी यात गुंतवणूक केली त्यांना 52.72 टक्के नफा होताना दिसत आहे.
त्याच वेळी, ज्यांनी 3 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती, त्याच्या भांडवलात 146 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

मंगळवारी शेअर बाजारात उत्साह होता. सेन्सेक्स 1,344.63 अंकांनी म्हणजेच 2.54 टक्क्यांनी वाढून 54,318.47 वर पोहोचला.
दिवसभराच्या व्यवहारादरम्यान, तो एका वेळी 1,425.58 अंकांनी वाढून 54,399.42 वर पोहोचला होता.

 

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी देखील 417 अंकांच्या किंवा 2.63 टक्क्यांच्या वाढीसह 16,259.30 वर बंद झाला,
सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 15 फेब्रुवारी 2022 नंतर एकाच दिवसात नोंदलेली ही सर्वात मोठी वाढ आहे.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे.
हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते.
त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
www.policenama.com
कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | these 3 stocks rattanindia infra policy bazaar elgi equipments that give big profits to investors in 3 days

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC IPO | एलआयसीचे काय होणार? 841 रूपये झाला शेअरचा भाव; जाणून घ्या शेअर मार्केटमधील हलचाल

 

Dolly Khanna Stock | दोन वर्षात डॉली खन्ना यांच्या शेअरने दिला 600% रिटर्न, अजूनही आहे का गुंतवणुकीची संधी?

 

Anti Corruption Bureau (ACB) Thane | भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर अँटी करप्शनकडून गुन्हा दाखल