Anti Corruption Bureau (ACB) Thane | भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर अँटी करप्शनकडून गुन्हा दाखल

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau (ACB) Thane | अवैध पद्धतीने कोट्यावधीची मालमत्ता जमवल्याप्रकरणी भाजपचे मीरा भाईंदरचे (Mira Bhayander) माजी आमदार (BJP Former MLA) नरेंद्र लालचंद मेहता (Narendra Lalchand Mehta) यांच्यावर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (Anti Corruption Bureau (ACB) Thane) कारवाई करण्यात आली आहे. तसेच मेहता यांच्यासह त्यांची पत्नी सुमन नरेंद्र मेहता (Suman Narendra Mehta) विरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात (Navghar Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत (Prevention of Corruption Act) आज (गुरुवार) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

नगरसेवक व आमदार असताना अधिकाराचा आणि पदाचा दुरोपयोग करुन त्यांच्या उत्पन्नापेक्षा 8 कोटी 25 लाख 51 हजार 773 इतक्या रक्कमेची असंपदा जमवल्याप्रकरणी मीरा भाईंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर ठाणे एसीबीने (Thane ACB) कारवाई केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दोन पथकाकडून नरेंद्र मेहतांच्या घर आणि कार्यालयात गुरुवारी दिवसभर तपासणी सुरु होती.

नरेंद्र मेहता यांनी 1 जानेवारी 2006 ते 31 ऑगस्ट 2015 या कालावधीत त्यांना मिळालेल्या अधिकाराचा व पदाचा दुरोपयोग करुन बेनामी संपत्ती (Anonymous property) गोळा केल्याची तक्रार लोकायुक्तांकडे (Lokayukta) करण्यात आली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (Anti Corruption Bureau (ACB) Thane) खुली चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ठाणे एसीबीने चौकशी सुरु केली होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर मेहता यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला.जानेवारी 2006 ते ऑगस्ट 2015 या कालावधीत नगरसेवक (Corporator) असताना अधिकाराचा आणि पदाचा दुरोपयोग करुन त्यांच्या उत्पन्नापेक्षा 8 कोटी 25 लाख 51 हजार 773 रुपये इतक्या रकमेची असंपदा जमवल्याचे एसीबीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title : Anti Corruption Bureau (ACB) Thane | Thane acb takes action against former bjp mla narendra mehta

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त