Multibagger Stocks | ‘या’ स्टॉकमुळे गुंतवणूकदार झाले मालामाल ! 6 दिवसात 29 रुपयांवरुन 42 रुपये; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Multibagger Stocks | अनेक लोक एक व्यवसाय म्हणून शेअर मार्केटकडे (Stock Market) अधिक वाटचाल करत असल्याचे पाहायला मिळते. त्यातच शेअर मार्केटमध्ये असे काही स्टॉक्स (Multibagger Stocks) असतात जे गुंतवणुकीत अधिक परतावा देत असतात. दरम्यान अशा काही स्टॉक्सची लवकरात लवकर निवड करणे अधिक महत्वाचे असते. दरम्यान, ज्याची किंमत केवळ 6 ट्रेडिंग सत्रांत 29 रुपयांवरून 42 रुपयांपर्यंत वाढली आहे. अशा स्टॉकबद्दल जाणून घ्या. जे तुमच्यासाठी असेल फायद्याचं.

 

मागील दोन आठवड्यामध्ये प्रमुख बेंचमार्क निर्देशांकांत मोठी विक्री होऊनही, काही स्मॉल कॅप शेअर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना (Investors) चांगला परतावा दिला. हा स्टॉक भक्ती जेम्स अँड ज्वेलरीचा (Bhakti Gems And Jewellery Ltd) आहे. या फॅशन स्टॉकचा दर 29.05 रुपये वरून आज मागील 6 ट्रेडिंग सत्रांत 42.65 रुपये झाला आहे. या कालावधीत जवळजवळ 46 टक्के वाढ नोंदवण्यात आलीय. (Multibagger Stocks)

 

भक्ती जेम्स अँड ज्वेलरी (Bhakti Gems And Jewellery Ltd) या शेअरची प्राईज हिस्ट्री भारतीय शेअर मार्केटमध्ये (Indian Stock Market) पडझड सुरु आहे. त्यामुळे या स्टॉकने 5 पैकी 3 सत्रांत 5 टक्के अपर सर्किट मारले आहेत. मागील काही महिन्यांपासून हा शेअर आपल्या भागधारकांना लाभदायक परतावा देत आहे. मागील एका महिन्यात शेअर 14.71 रुपयांवरून 42.65 रुपयांपर्यंत वाढले आहे. यामध्ये 190 टक्क्यांनी वाढ झालीय. तसेच, मागील 6 महिन्यांत, स्टॉक 17.85 रुपयांवरून 42.65 रुपयांपर्यंत वाढला आहे, या काळामध्ये साधारण 140 टक्के वाढ झालीय.

दरम्यान, या शेअरच्या दरानुसार त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 91.95 आहे जो त्याने मागील वर्षी फेब्रुवारीत बनवला होता
तर 52 आठवड्यांचा नीचांक 10.60 होता जो नुकताच नोव्हेंबर 2021 मध्ये तयार केला होता.
फॅशन कंपनीचे प्रति शेअर बुक व्हॅल्यू 15 रुपयांपेक्षा थोडे अधिक आहे, तर तिचे ट्रेड व्हॉल्यूम 2,34,295 आहे,
जे 20 दिवसांच्या सरासरी ट्रेड व्हॉल्यूम 3 लाख 86 हजार 535 पेक्षा कमी आहे.

 

Web Title :- Multibagger Stocks | multibagger stock 2022 fashion stock bhakti gems and jewellery ltd gave 46 percent return in 6 sessions

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PM Kisan Yojana | कोट्यवधी शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! 11व्या हप्त्याबाबत ही नवीन माहिती जाणून घ्या

 

Post Office MIS Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये 6.6 टक्के मिळत आहे वार्षिक व्याज, दरमहिना येऊ शकते मोठी रक्कम; जाणून घ्या कशी?

 

PVC Aadhaar Card मागवणं झालं एकदम सोपं, एका ऑर्डरमध्ये येईल संपूर्ण कुटुंबाचं कार्ड; जाणून घ्या