Multibagger Sugar Stock | 27 रुपयांच्या शुगर स्टॉकने वाढवला गुंतवणुकदारांचा गोडवा, वर्षभरात 3 पट मिळाला रिटर्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Sugar Stock | भारतीय शेअर बाजारात विविध क्षेत्रांतील असे अनेक स्टॉक्स आहेत ज्यांनी वर्षभरात मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. असाच एक शेयर द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड Dwarikesh Sugar Industries (DSI) चा आहे. या शुगर शेयरने वर्षभरात तिप्पट रिटर्न दिला आहे. टक्केवारीनुसार, या समभागाने 200 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये पैसे लावले होते, ते आता मालामाल झाले असतील. (Multibagger Sugar Stock)

किती आहे शेअरची किंमत :
गेल्या वर्षभरात शेअरची किंमत 27.5 रुपयांवरून 95.35 रुपयांपर्यंत वाढली. 17 जानेवारी रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 99.50 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर होती. बाजार भांडवलाबद्दल बोलायचे तर ते 1,760 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

 

रक्कमेच्या हिशेबाने विचारात घ्या :
वर्षभरात द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेयरने 247% रिटर्न दिला आहे. या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये वर्षभरापूर्वी गुंतवलेली 5 लाख रुपयांची रक्कम आज 17.36 लाख रुपयांवर गेली आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा कमावला आहे. गेल्या दहा वर्षांत त्यात 2,100 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. (Multibagger Sugar Stock)

भविष्य काय आहे :
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून या शुगर शेयरकडे लक्ष लागले आहे. खरंतरं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इथेनॉल किंवा बायोडिझेलचे मिश्रण न करता विकल्या जाणार्‍या इंधनावर अतिरिक्त उत्पादन शुल्क लादल्यानंतर सर्वांची नजर शुगर शेयरवर आहे.

 

ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्टने म्हटले आहे की यामुळे इंधनाच्या इथेनॉल मिश्रणाला चालना मिळेल आणि साखर कंपन्यांसाठी हे सकारात्मक असेल.
इथेनॉलसाठी ऊस आणि साखर कंपन्यांची मोठी भूमिका असेल.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

 

Web Title :- Multibagger Sugar Stock | sweetness dwarikesh sugar industries multibagger sugar stock zoomed over 240 percent in one year

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC Exam | MPSC विद्यार्थ्यासाठी महत्वाची माहिती ! वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

 

Sangli Crime | सांगली जिल्ह्यात ‘सैराट’ ! प्रेमविवाह केला म्हणून तरुणावर प्राणघातक हल्ला; परिसरात खळबळ

 

राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये OBC Reservation चा मार्ग मोकळा होणार? राज्य मागासवर्गीय आयोगाचा अंतरिम अहवाल शनिवारी तयार होणार