राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये OBC Reservation चा मार्ग मोकळा होणार? राज्य मागासवर्गीय आयोगाचा अंतरिम अहवाल शनिवारी तयार होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ओबीसी आरक्षणासंदर्भातील (OBC Reservation) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला अंतरिम अहवाल (Interim Report) देण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची (State Backward Classes Commission) आज पुण्यात (Pune) बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारकडून (State Government) देण्यात आलेल्या आकडेवारीच्या आधारावर आयोगाने अंतरिम अहवाल तयार केला आहे. हा अहवाल राज्याच्या मुख्य सचिवांना (Chief Secretary of State) सादर करण्यात येणार असून 8 फेब्रुवारीला तो सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सादर केला जाणार आहे. यानंतर राज्यातील स्थानिक निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मार्ग मोकळा होण्याची दाट शक्यता आहे.

 

मागासवर्गीय आयोगाचे सदस्य बी.एल. सागर किल्लारीकर (B.L. Sagar Killarikar) यांनी बैठकीनंतर एका वृत्तवाहीनीला प्रतिक्रिया देताना सांगितले, सरकारने दिलेल्या आकडेवारीवर (Statistics) आज काम केले. परंतु अंतरिम अहवाल तयार करण्याचे काम आज वेळेअभावी पुर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे उद्या (शनिवार) पुन्हा 11 वाजता बैठक होणार आहे. दुपार पर्यंत अंतरिम अहवाल तयार करण्याचे काम पूर्ण होईल. सोमवारी (दि.7) आयोगाकडून हा अहवाल मुख्यमंत्र्यांना (CM) सादर केला जाईल. यानंतर तो 8 तारखेला सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाईल.

 

राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाने आम्हाला दोन आठवड्यात निर्णय घेण्यास सांगितले होते. तसा आदेश दिला होता. तसेच अंतरिम अहवाल तयार करण्याचेही आदेश देण्यात आले होते. या दोन्ही आदेशांच्यादृष्टीने आमचं काम सुरु आहे. परंतु या दोन्ही बाबींचा अहवाल आज सांगता येणार नाही. याबाबतची माहिती शनिवारी म्हणजे उद्या अहवाल तयार झाल्यावर समजेल.

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुडे (Justice Anand Nirgude) हे मुंबईत असून त्यांची प्रकृती बरी नसल्याने ते आजच्या बैठकीत हजर राहू शकले नाहीत. परंतु ते ऑनलाईन सहभागी झाले होते. आजच्या बैठकीत सरकारने दिलेल्या अहवालावर चर्चा झाली.
तसेच सर्व बाजूंनी विचार करण्यात आला. सदस्यांनी आजच्या बैठकीत आकडेवारी तपासली.
आयोगाचा उद्याच्या बैठकीत अंतिम अहवाल तयार होईल. या अहवालामुळे राज्यातील ओबीसींना (OBC Reservation) दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
कारण हा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केल्यानंतर राज्यातील ओबीसींना तुर्तास आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- OBC Reservation | maharashtra backward classes commission prepared an interim report on obc political reservation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Koregaon Bhima Case | कोरेगाव भीमा दंगल प्रकरणासंदर्भात विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलवणार? पुराव्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आयोगाचे आदेश

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 13,840 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Corporation Employees | पुणे महापालिकेतील समाविष्ट 23 गावांतील 46 ‘बोगस’ कर्मचारी ‘बडतर्फ’; सर्वाधिक बोगस भरती बावधन बु. आणि नर्‍हे ग्राम पंचायतीमध्ये झाल्याचे उघड