MPSC Exam | MPSC विद्यार्थ्यासाठी महत्वाची माहिती ! वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

पोलीसनामा ऑनलाइन टीम – MPSC Exam | एमपीएससी विद्यार्थ्यासाठी महत्वाची माहिती समोर (MPSC Exam) आली आहे. कोरोनाच्या महामारीत (Coronavirus) राज्यातील भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. या दरम्यान आता MPSC परिक्षेसाठीची वयोमर्यादा ओलांडणाऱ्या हजारो उमेदवारांना राज्य सरकारकडून (Maharashtra Government) दिलासा देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना 31 डिसेंबर 2021 पर्यंत ज्या विभागाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध होतील, अशा परीक्षेला विशेष बाब म्हणून एकवेळ बसण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी आता वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

 

1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याकरिता वेबलिंक सुरू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) देण्यात आली. अशा विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान हे अर्ज करण्याचा अंतिम तारिख 9 फेब्रुवारी 2022 असणार आहे. याबाबत माहिती MPSC ने आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. (MPSC Exam)

दरम्यान, कमाल वयोमर्यादा ओलांडल्याने त्यांना परिक्षेला बसता येणार नव्हते, मात्र शासनाने त्यांना एक संधी उपलब्ध करुन दिलीय. तर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत 1 मार्च 2020 पासून जाहिराती प्रसिध्द न झाल्यामुळे शासनाने संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे अथवा संदर्भाधीन 25.मार्च 2016 च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा, दिनांक 1 मार्च 2020 ते या शासन निर्णयाच्या दिनांका पर्यंतच्या कालावधीत, ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे, अशा उमेदवारांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात ज्या जाहिराती प्रसिध्द होतील, त्या जाहिरातीसाठी “एक वेळची विशेष बाब” म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे. असं राज्य शासनाने काही दिवसांपुर्वी घेतलेल्या निर्णयात म्हटलं होतं.

 

Web Title :- MPSC Exam | mpsc exam application process started for candidates who have crossed the age limit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sangli Crime | सांगली जिल्ह्यात ‘सैराट’ ! प्रेमविवाह केला म्हणून तरुणावर प्राणघातक हल्ला; परिसरात खळबळ

 

राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये OBC Reservation चा मार्ग मोकळा होणार? राज्य मागासवर्गीय आयोगाचा अंतरिम अहवाल शनिवारी तयार होणार

 

Koregaon Bhima Case | कोरेगाव भीमा दंगल प्रकरणासंदर्भात विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलवणार? पुराव्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आयोगाचे आदेश

 

Pune Corporation Employees | पुणे महापालिकेतील समाविष्ट 23 गावांतील 46 ‘बोगस’ कर्मचारी ‘बडतर्फ’; सर्वाधिक बोगस भरती बावधन बु. आणि नर्‍हे ग्राम पंचायतीमध्ये झाल्याचे उघड