धक्कादायक ! वडिल अन् आजोबांची हत्या, नंतर केली तरूणानं स्वतः आत्महत्या, मुलुंडमधील घटना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एका तरुणाने स्वतःचे वडील, आजोबा यांची चाकूने सपासप वार करून हत्या केली असून स्वतः सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. मुंबईतील मुलुंडमधील वसंत ऑस्कर इमारतीमध्ये शनिवारी (दि. 6) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तरुणाने हे क्रुर कृत्य का केले याचे कारण समजू शकले नाही.

शार्दूल मांगले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शार्दूलने शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान त्याचे वडील मिलिंद मांगले आणि आजोबा सुरेश मांगले यांच्यावर चाकूने सपासप वार केले. यात गंभीर जखमी झाले. या वेळी त्यांचा केयरटेकर अनंत कांबळे घरात होता. त्याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र शार्दूलचे कृत्य पाहून तो बाथरुममध्ये कडी लावून लपला. त्यानंतर शार्दूलने देखील इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. मुलुंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु केला आहे.