‘प्रेमात पाय घसरला’ अन् तिच्या घरात शिरताना ९ मजल्यावरून कोसळला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रेम आंधळ असतं असे म्हटले जाते. प्रेम कधी आणि कोणावर होईल याचा काही नेम नाही. असाच प्रकार मुंबईत घडला आहे. एका विवाहीतेच्या प्रेमात पडलेल्या तरूणाला तिला भेटण्यासाठी जात असताना इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून पडून जीव गमवावा लागला. ही दुर्दैवी घटना आग्रीपाडामध्ये घडली असून मृत १९ वर्षीय तरुण मुळचा बिहारचा असून तो दोन वर्षापूर्वी मुंबईत आला होता.

मृत तरुण राहत असलेल्या इमारतीमधील एका विवाहीतेसोबत त्याचे प्रेम संबंध जुळले होते. तो तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जात होता. मात्र, त्याच्या काकांनी त्याला पाहिल्यानंतर त्याने प्रेयसीला भेटण्यासाठी खिडकीवाटे जात होता. मध्यरात्री तो प्रेयसीला भेटण्यासाठी प्रेयसीच्या प्लॅटमध्ये खिडकीवाटे घुसण्याचा प्रयत्न करत असताना तो ९ मजल्यावरून पडला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रात्री अडीचच्या सुमारास सुरक्षा रक्षकाला एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

मुंबईतील नायर रुग्णालयाजवळ असलेल्या १५ मजली टॉवरमध्ये तो आपल्या काकांकडे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचे याच इमारतीमधील २४ वर्षीय विवाहितेसोबत प्रेमसंबंध जुळले होते. तिच्या घरातून बाहेर पडताना काकांनी पाहिल्याने तो थेट तिच्या घरात जाऊ शकत नव्हता. त्यामुळे तो भिंतीला लागून असणाऱ्या कठड्यावाटे खिडकीतून महिलेच्या घरी प्रवेश करत होता. यापूर्वी अनेक वेळा तो अशाच प्रकारे तिला भेटण्यासाठी गेला असल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांनी दिली आहे. मंगळवारी रात्री तो अशाच प्रकारे तिला भेटण्यासाठी गेला होता. खिडकीतून डोकावून पाहिले असता महिलेचा पती घरात होता.

प्रेयसीचा पती घरात असल्याने त्याने माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. सध्या पावसाळ्याचे दिवस असून दोन दिवस झाले सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे भिंतीचा कडा निसरडा झाला होता. त्यामुळे त्याचा ९ व्या मजल्यावरून तोल जाऊन तो खाली पडला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. महिलेकडे पोलिसांनी चौकशी केली असता, काहीतरी खाली पडल्याचा आवाज मी ऐकला होता. मात्र, पती घरात असल्याने मी बाहेर जाऊन पाहिले नसल्याचे तिने सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या