मुंबई-बेंगलोर मार्ग मौत का कुआ, दुचाकीसह नाल्यात पडल्याच्या तीन घटना!

देहूरोड: पोलीसनामा आॅनलाइन

देहूरोड परिसरातील मुंबई बेंगलोर मार्गावरील सर्व्हिस रोड चे काम सुरू आहे. मात्र, दोन्ही बाजूंचे काम झाले असून मध्यभागी नाला सोडला आहे. यात दुचाकी चालक थेट गाडीसह नाल्यात पडल्याच्या घटना घडत आहेत. शनिवार पासून या नाल्यात चक्क तिघांचा जीव जाता-जाता राहिला असून एक जण गंभीर जखमी झाला. त्यामुळे हा नाला नसून मौत का कुआच आहे असे म्हणाव लागेल.

देहूरोड येथील मुंबई बेंगलोर मार्गावर सर्व्हिस रोडचे काम सुरू आहे. दोन्ही कडील रस्ते झाले आहेत, परंतु रस्त्याच्या मधोमध असलेल्या नाल्यावर स्लॅब टाकण्याचे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे. सर्व्हिस रोड असल्याने वाहनांची गर्दी असते, शनिवार रात्री दहा च्या सुमारास दुचाकी चालक गाडीसह थेट या नाल्यात पडला. हा नाला २० ते २५ फुटांचा आहे. या घटनेत सोपान कुंजीर हा जखमी झाला आहे. तर आज पहाटे रोहित सोनवणे नाल्यात दुचाकीसह पडल्याने तो देखील जखमी झाला आहे. त्याचबरोबर सकाळी अकरा वाजता अश्याच प्रकारे एक जण पडला. मात्र त्या तरुणचे नाव समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती देहूरोड पोलिसांनाही नाही, तसेच रस्त्यावर काम सुरू असल्याचे फलकही लावण्यात आले नाहीत. त्यामुळे येथे अश्या प्रकारच्या घटना घडत आहेत.